Pratikar News
—
घुघुस – शहरात मागील काही महिन्यांपासून चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे, यावर पोलीस यंत्रणा पण कुचकामी ठरत आहे.
29 जुलै च्या रात्री घुघुस शहरातील रामनगर वेकोली वसाहतीमधील तब्बल 4 घरात घरफोडीची घटना घडली.
चोरांनी रोख रकमेवर डल्ला मारला आहे, विशेष म्हणजे वेकोलीच्या ज्या 4 क्वार्टर मध्ये ही घटना घडली ते काही अंतरावर स्थित आहे.
चोरांनी आधी या घरांची रेकी केली असावी व वेळ बघून घरफोडी करण्यात आली.
यामध्ये B8 क्वार्टर मध्ये राहणारे डॉ. चंद्रशेखर चौधरी, B2 शोभा रामराव भोयर, MQ 345 प्रोमिल मंडल, MQ 36 जंगा ओदलू यांच्या घरून एकूण 15 ते 20 हजारांची रोख रक्कम गहाळ करण्यात आली.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आधी वेकोली वसाहतीमध्ये पोलिसांची नियमित गस्त व्हायची मात्र आता रात्र झाली की कुणीही या ठिकाणी भिरकत सुद्धा नाही.
वारंवार घडणाऱ्या घरफोडी गुन्ह्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Post Views:
39