Home Breaking News कळमना येथील पांदण रस्त्याच्या बैलबंडी आंदोलनाला यश वचिंतच्या दणका* *रस्ता मोकळा...

कळमना येथील पांदण रस्त्याच्या बैलबंडी आंदोलनाला यश वचिंतच्या दणका* *रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल वंचितचे नेते राजू झोडे यांनी प्रशासनाचे आभार मानले*

51
0

*कळमना येथील पांदण रस्त्याच्या बैलबंडी आंदोलनाला यश वचिंतच्या दणका*

*रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल वंचितचे नेते राजू झोडे यांनी प्रशासनाचे आभार मानले*

*बल्लारपूर:-* बल्लारपूर तालुक्यातील कळमना (आष्टी रिट) येथील ४० ते ५० शेतकरी दररोज चंदेल यांच्या शेताच्या बाजूला लागून असलेल्या पांदण रस्त्यांवरून आपल्या शेतीत ये-जा करतात. भाजपाचे चंदेल यांनी आपल्या मनमर्जीने त्यांच्या शेतालगत लागून असलेल्या रस्त्यावरून शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी मज्जाव करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्यांना घेऊन गावकऱ्यांनी वंचितचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन देऊन पांदण रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती व आंदोलनाचा इशारा दिला होता. आज शेतकऱ्यांनी आंदोलनाची सुरुवात करताच प्रशासनाने मागणीची दखल घेऊन पांदण रस्ता मोकळा करून दिला.
मागील कित्येक वर्षापासून गावातील शेतकरी सदर पांदण रस्त्यातून ये-जा करत शेतीचे काम करत होते. परंतु लखन सिंग चंदेल यांनी आपली शेती बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्यामुळे त्यांनी आपल्या शेतीची मोजणी चुकीच्या पद्धतीने करून नकाशावरून पांदण रस्ता गहाळ केला. मोजणी केल्यानंतर चंदेल यांनी पांदन रस्ता संपूर्ण बंद केला त्यामुळे कळमना गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीची वहीवाट करण्यासाठी कोणताही रस्ता नसल्यामुळे गावातील शेतकरी हवालदिल झालेले होते. भाजपाचे चंदेल यांनी आर्थिक पाठबळाच्या जोरावर संबंधित प्रशासनाशी हात मिळवणी करून सुरु असलेल्या पांदण रस्ता बंद केला होता.चंदेल यांच्या माध्यमातून बालाजी कंपनीने जो रस्ता हळप केलेला आहे तो ताबडतोब पूर्ववत सुरू करावा अन्यथा गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी प्रशासनाला दिला होता. गावकऱ्यांनी बैलबंडी मोर्चा काढत व नारेबाजी करत आंदोलनाची सुरुवात केली होती.आंदोलनाला सुरुवात होताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पांदन रस्ता मोकळा करून देत असल्याचे लेखी पत्र आंदोलनाच्या ठिकाणी दिले.आंदोलन यशस्वी होताच गावकऱ्यांनी वंचित चे नेते राजु झोडे व प्रशासनाचे आभार मानले. सदर आंदोलनात वंचितचे नेते राजू झोडे, सचिन पावडे, मिलिंद मांढरे, मयुर साळवे, प्रदीप झांमरे, कैलास शेडमाके, मारोती मडावी, सुधाकर आत्राम, सुनील उरकुडे, व प्रदिप धानोरकर तथा कळमना गावातील शेतकरी व वंचित चे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here