Home क्राइम व्हॉट्सॲपने केला घोळ – बारावीच्या विद्यार्थिनीचे कारमधून अपहरण, प्रियकरासह तिघांना...

व्हॉट्सॲपने केला घोळ – बारावीच्या विद्यार्थिनीचे कारमधून अपहरण, प्रियकरासह तिघांना अटक

38
0

Pratikar News
Jul 26, 2021

By
Nilesh Nagrale

नागपूर : प्रियकराशी सकाळपासून व्हॉट्सॲप चॅटिंग करणाऱ्या मुलीला वडिलांनी रंगेहात पकडले. शिक्षणाकडे लक्ष देण्याऐवजी प्रेमप्रकरण करीत असल्यामुळे मुलीला वडिलांनी झापले. रागाच्या भरात मुलीने प्रियकराला फोन केला आणि निघून गेली. या प्रकरणी वडिलाच्या तक्रारीवरून मुलीच्या प्रियकरासह तिघांना बेलतरोडी पोलिसांनी (beltarodi police nagpur) अटक केली. (12 class student kidnapped in nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गिरीष गणेश गोडबोले (२०, रा. मुंजेबाब आश्रम लेआउट, हिलटॉप) हा पदवीचे शिक्षण घेत असून आईसह राहतो. त्याचे बेलतरोडी परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) ही बारावित शिकते. गिरीष आणि रिया एकाच कॉलेजमध्ये शिकतात. त्यामुळे दोघांत ओळखी होती. ती अकरावीत असताना तिचे गिरीषसोबत सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध वाढल्याने भेटी-गाठी होत होत्या. दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर चॅटिंग होत होती. रिया ऑनलाइन क्लास झाल्यानंतर फोनवर व्यस्त राहत होती. त्यामुळे तिच्या वडिलांना अनेकदा संशय आला. मात्र, साध्या स्वभावाच्या रियावर वडिलांचा विश्‍वास होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ती जेवण करतानासुद्धा व्हॉट्सॲपवर चॅटिंग करीत असल्याने वडिलांना संशय आला. शनिवारी बेडरूममध्ये ती चॅटिंग करीत असताना अचानक तिचे वडिल रूममध्ये आले. त्यांना बघताच तिने मोबाईल लपविण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी तिला मोबाईल मागितला. परंतु तिने देण्यास नकार दिला. वडिलांचा संशय आणखी वाढला.

व्हॉट्सॲपने केला घोळ –

रियाच्या मोबाईलमध्ये गिरीषा नावाने मोबाईल नंबर सेव्ह होता. त्या नंबरशी केलेली चॅटिंग वडिलांनी बघितली. दोघांचे प्रेमसंबंध खूप पुढे गेल्याचे लक्षात येताच वडिलांनी तिला दोन कानशिलात लगावल्या. तिच्या आईला बोलवून प्रकार कानावर घातला. आईनेही तिला चांगले रागावले. हे प्रकरण बंद करण्याचा सल्ला दिला आणि वडिल बाहेर गेले.

प्रियकराला केला फोन –

गिरीषला रियाने लगेच फोन केला आणि वडिलांना मारल्याची तक्रार केली. त्याने लगेच मित्र ऋषिकेश रामचंद्र पाटील (२४, रा.हिलटॉप) आणि अनुराग गजानन नागतोडे (१९, गणेशकॉलनी, प्रतापनगर) यांना फोन केला. प्रेयसीवर अन्याय होत असल्याचे सांगून कार घेऊन प्रेयसीच्या घरी पोहोचला. रियाने लगेच तयारी केली प्रियकराच्या कारमध्ये बसून निघून गेली.

रात्री एक वाजता कार अडविली –

गिरीष आणि रिया दोघेही कारमध्ये रात्री एक वाजता अंबाझरी हद्दीत होते. बीट मार्शल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ‘एवढ्या रात्री तीन मुलांसोबत काय करतेस?’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर तिने उद्धट उत्तर दिले. पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी बेलतरोडी पोलिसांना फोन करून चौघांनाही ताब्यात दिले. पोलिसांनी तिघांना अटक केली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here