Home Breaking News तेलंगणातील तिर्यानी धबधब्यात राजुरा तालुक्यातील देवाडा येथील युवक वाहून गेला? *शोध सुरू*

तेलंगणातील तिर्यानी धबधब्यात राजुरा तालुक्यातील देवाडा येथील युवक वाहून गेला? *शोध सुरू*

2802
0

तेलंगणातील तिर्यानी धबधब्यात राजुरा तालुक्यातील देवाडा येथील युवक वाहून गेला?
*शोध सुरू*

राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-

तेलंगणातील आशिफाबाद जवळींल तिर्यानी येथील धबधब्यावर गेलेल्या राजुरा तालुक्यातील देवाडा येथील युवक वाहून गेल्याचे समजते,रामकीसन बिजू लोहोबले वय 19 वर्ष असे त्याचे नाव आहे
तेलंगणातील आशिफाबाद पासून 25 किलोमीटर अंतरात असलेल्या तिर्यानी परिसरातील धबधबा प्रसिद्ध आहे दरवर्षी या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी सीमेलगतच्या महाराष्ट्रातील पर्यटक मोठया संख्येत येतात राजुरा तालुक्यातूनही दररोज पर्यटक येत आहे दरम्यान आज दिनांक 21 जुलै रोजी बकरी ईद निमित्य सुट्टी असल्याने राजुरा तालुक्यातील देवाडा येथील रामकीसन लोहोबळे,सुरज साधू हरणधारे,राजकुमार छोले,साहिल मेश्राम आणि काही युवक एका वाहनाने तिर्यानी धबधब्यावर गेले होते धबधब्यावर आनंद घेत असतानाच उंचावरून खोल पाण्यात उडी घेतल्याने या युवकांपैकी तिघेजण वाहून गेले सुदैवाने दोघे जण सुखरूप निघालेत परंतु रामकीसन लोहोबळे हा खोल पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु व्यर्थ ठरला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला
ही वार्ता देवाडा येथे पोहोचताच खळबळ उडाली असून नातलग घटनास्थळी धाव घेतली असून आशिफाबाद पोलीस ही पोहचले असल्याचे समजते वृत्त लिहिपर्यंत शोध लागला नव्हता
हा धबधबा अतिशय धोकादायक असूनही पर्यटक जीव धोक्यात घालून जात आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here