तोहोगावचे पशुचिकित्सालयात कर्मचारी विना?
पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष,,,पशुपालकात संताप
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथे उच्च श्रेणी पशुचिकित्सालाय आहे परंतु मागील वर्ष भरापासून पशु वैद्यकीय अधिकारी सह इतर कर्मचारी पदे रिक्त आहे याबद्दल मागणी करूनही पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वेळेत पाळीव जनावरांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहे यामुळे पशुपालकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे
येथील पशुचिकित्सालयात एक पशु वैदयकीय अधिकारी,एक ड्रेसर,दोन परिचर असे ,पदे मंजूर आहे पैकी सध्या मागील वर्षभरापासून केवळ चपराशी हाच कर्मचारी कार्यरत असून इतर आवश्यक पदे रिक्त आहे याबद्दल येथील पशुपालकांनी स्थानिक आमदार सुभाष धोटे,आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे सदर पदे भरण्याबाबत निवेदन दिले आहे असे असतानाही पशुसंवर्धन विभागाचे मात्र या मागणीकडे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगून या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे
परिणामी पाळीव जनावरांना वेळेवर उपचार होऊ शकत नाही आहे,दुग्ध व्यवसाय दृष्टिकोनातून असलेली संकरित प्रजनन जनावरे योजना पासून पशुपालक वंचित राहत आहेत
या पशुचिकित्सालाय अंतर्गत कुडेसावली,परसोडी,आर्वी वेजगाव,पाचगाव या गावाचा समावेश आहे परंतु पशुसंवर्धन कर्मचारीच नसल्याने या गावातील पशुपालकांत तीव्र संताप व्यक्त केले जात आहे
याची दखल घेऊन तात्काळ रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी पशुपालक बाबुराव बोनडे,योगेश खामनकार आदी पशुपालकांनी केली आहे.