Home कृषी भूमी अधिग्रहणाबाबत राजुरात कार्यशाळा संपन्न….

भूमी अधिग्रहणाबाबत राजुरात कार्यशाळा संपन्न….

144
0

भूमी अधिग्रहणाबाबत राजुरात कार्यशाळा
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
नागपूर स्थित एसएनजीसी या संस्थेने राजुरा येथे भूमी अधिग्रहणाबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात अडव्होकेत जे बी चव्हाण,रितेश साहू,ऍड पूजा डागा,ऍड अवनी जैन,ऍड राधा देशमुख,चंद्रभान कुंभारे,राहुल शिंदे,अभय डोंगरे या मान्यवरांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती
भूसंपादन म्हणजे काय ?भूसंपादन कायदा व त्यानुसार मिळणारी भरपाई या अनुषंगाने राजुरा परिसरातील भूमी अधिग्रहित शेतकार्याशी प्रत्यक्ष संवाद साधून शेतकर्याचे असणारे अधिकार व भूमी अधिग्रहण संदर्भात येणारे अडचणी व त्यावरील उपाय याबाबत या संस्थेच्या मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले राष्ट्रीय महामार्ग 930 ड,आणि 353 बी या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे या विस्तारीकरण कामात शेतकऱ्याच्या शेती व गावठाण जागेचे अधिग्रहण करण्यात येणार आहे ,या अधिग्रहणाचा मोबदला देण्यात येणार आहे या प्रकल्पाबाबत होत असलेली संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणे,शंका निरसन करणे,अडचणी दूर करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते विशेषतः भूमी अधिग्रहण खटल्यामध्ये शेतकऱयांना योग्य मोबदला मिळवून देण्यात ही संस्था अग्रेणीत आहे या संस्थेकडे वकील,संधीलेखापाल,आणि इतर 35 तज्ज्ञाची चमू आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here