Home Breaking News 11 हजारांची सुपारी देत दुर्गापुरात हत्या, 24 तासांच्या आत आरोपींना ठोकल्या बेड्य

11 हजारांची सुपारी देत दुर्गापुरात हत्या, 24 तासांच्या आत आरोपींना ठोकल्या बेड्य

48
0

 

चंद्रपूर – 17 जुलै ला दुर्गापुर बेताल चौक झोपडपट्टी परिसरात 50 वर्षीय बंडू संदोकार यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता, मृतदेहाचा तोंडात दुपट्टा कोंबलेला व गळा सेंटरिंग तारने आवळून होता.

यावेळी घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर व दुर्गापूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे दाखल झाले.
पोलीस निरीक्षक धुळे यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली असता बंडू संदोकार यांचं जागेच्या कारणावरून बाबूपेठ निवासी 52 वर्षीय जमनाबाई शत्रूघन गंजीर यांच्याशी वाद झाला होता.
11 जुलैला घडलेल्या वादाचा जमनाबाई यांनी राग मनात पकडून ठेवला होता त्यानुसार उमेश गंजीर व जमनाबाई यांनी मिळून बंडूचा काटा काढण्याचं ठरविले.
बगड खिडकी येथील 21 वर्षीय करन किसन डोंगरे, महाकाली वार्ड येथील 21 वर्षीय शंकर हनुमान तुमराम यांना 11 हजारांची सुपारी दिली.
नियोजित योजनेप्रमाणे आरोपीनी बंडू ला दारू पाजली व त्याच्या झोपडीत बंडू च्या तोंडात दुपट्टा कोंबत गळ्याला सेंटरिंग च्या ताराने आवळून ठार मारले.
दुर्गापुर पोलिसांच्या शिताफीने सदरील हत्येचा गुन्हा 24 तासांच्या आत उघडकीस आणत 4 आरोपींना अटक केली.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात सपोनि रोशन बावनकर, पोउपनी प्रवीण सोनुने, किशोर सहारे, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, अमोल घोरुडे, रवींद्र धुर्वे, मनोहर जाधव, संतोष आडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here