Home Breaking News चंद्रपूर मनपा आयुक्तांनी चक्क महापौर यांच्या वाहनांच्या VIP क्रमांकासाठी 70 हजार रुपये...

चंद्रपूर मनपा आयुक्तांनी चक्क महापौर यांच्या वाहनांच्या VIP क्रमांकासाठी 70 हजार रुपये मोजले.

51
0

Pratikar News

चंद्रपूर – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांनी बेड व ऑक्सिजन अभावी आपला जीव गमावला, दुसऱ्या लाटेत केंद्र व राज्य सरकारने कोरोनावर निधी खर्च करण्यास भर दिला.

मात्र चंद्रपूर मनपा आयुक्तांनी चक्क महापौर यांच्या वाहनांच्या VIP क्रमांकासाठी 70 हजार रुपये मोजले.
चंद्रपूर शहर म.न.पा.ने दि . 24/2/2021 रोजी वाहन XL6 Alpha Nexa Company चे वाहन खरेदीसाठी रुपये 11,18,168 / – मंजूर केले . सदर वाहन मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्यासाठी वापरण्यात येणार असल्याने या वाहनाकरीता V.I.P. क्रमांक MH34 BV 1111 यासाठी राज्य परिवहन विभागाकडे तब्बल 70,000 / – रुपये खर्च केले . दरम्यान याच एप्रिल महिन्यात चंद्रपूर शहरात कोरोनाची दुसरी लाट उच्च पातळीवर होती. यामुळे हजारो रुग्ण दररोज रुग्णालयात भरती होत होते. कोरोना रुग्णासाठी आवश्यक व्हेंटीलेटर , ऑक्सीजन , बेड , इंजेक्शन न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला अशी भयानक परिस्थिती असताना केंद्र , राज्य सरकारने देखील कोरोना उपचारासाठी पैसे खर्च करण्यास प्राध्यान्य देण्याचे आदेश दिले मात्र चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश माहिते यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत मनपा महापौरसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाच्या V.I.P. क्रमांकासाठी 70,000 / – रुपये जनतेच्या कर रुपी पैशातून खर्च केले . हा प्रकार जनतेचा विश्वासघात करणारा आहे. यामुळे चंद्रपूर शहर मनपा आयुक्त राजेश माहिते यांच्यावर पदाचा दुरुपयोग करुन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा ठपका ठेवून कडक कारवाई करीत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी निवेदनातून मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here