Home विशेष खूशखबर ; तब्बल तीन महिन्यांनंतर देशभरात इंधन झालं स्वस्त!

खूशखबर ; तब्बल तीन महिन्यांनंतर देशभरात इंधन झालं स्वस्त!

44
0

Pratikar News

मुंबई : इंधन दरवाढीचा सपाटा लावणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांना आज माणुसकीचा पाझर फुटला आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर कंपन्यांनी आज सोमवारी डिझेल दरात कपात केली आहे. तर दुसऱ्या बाजुला पेट्रोलमधील दरवाढ कायम ठेवली आहे. डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले तर पेट्रोल २८ पैशांनी महागले आहे.

कंपन्यांनी रविवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर शनिवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये २६ पैशांची वाढ झाली होती. तीन महिन्यांनंतर डिझेलमध्ये दर कपात करण्यात आली असली तर पेट्रोलमधील महागाई कायम आहे. आज पेट्रोल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

आजच्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२० रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.९२ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.३५ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.५३ रुपये इतका वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.५८ रुपये झाले आहे.

गुंतवणूकदारांना दिलासा; फ्रॅंकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाकडून मिळणार पाचवा हप्ता
आजच्या दर कपातीने मुंबईत डिझेलचा भाव ९७.२९ रुपये झाला आहे. रविवारी तो ९७.४६ रुपये इतका होता. दिल्लीत डिझेल ८९.७२ रुपये झाले आहे. चेन्नईत ९४.२४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.८१ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.५० रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.०९ रुपये आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाने ७५ डॉलरची पातळी ओलांडल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. कंपन्यांच्या आयात खर्चात वाढ झाली असून त्याचा भार ग्राहकांवर लादला जात आहे. मागील दोन महिन्यात देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दर सध्या विक्रमी पातळीवर आहे.

गेल्या शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या आठवड्यात जागतिक बाजारात तेलाचा भाव १.४३ डॉलरने वधारला. ब्रेंट क्रूडचा भाव ७५.५५ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.६२ डॉलरने वधारून ७४.५६ डॉलर प्रती बॅरल झाला.

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here