Pratikar News
नागपूर: ज्वारी (sorghum) हे गरिबांचे धान्य म्हणून तीन दशकापूर्वी समजले जायचे, गहू (Wheat)फक्त सणासुदीलाच त्याच्या ताटात दिसत असे. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. ज्वारीचे भाव वाढल्याने आणि भाकरी पचण्यास हलकी असल्याने आता श्रीमंतीचे प्रतीक झाले आहे. गव्हापेक्षा भाकरीचे भाव दुप्पट झालेले आहे. गरिबांच्या ताटात भाकरीऐवजी चपाती दिसू लागली आहे.

साधारणता उंची दादरी ज्वारी ५२ रुपये किलो आहे. या तुलनेत गव्हाचे दर २५ रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे एका किलो ज्वारीत दोन किलो गहू येतो. सध्या महागाईने हिमटोक गाठल्याने अशा परिस्थितीत महागडे धान्य खाणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. केंद्र सरकारने रेशनवर गहू मोठ्या प्रमाणात देण्याचा निर्णय घेतला. एका कुटुंबाला किमान दहा किलो गहू तेही तीन रुपये दराने मिळतो. त्यामुळे ५० रुपये किलो ज्वारी, शाळू घेण्यापेक्षा त्यामध्ये रेशनवरील गहू खाण्याकडे ओढा वाढला आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गव्हाची विक्रीही कमी झालेली आहे. परिणामी, कोरोनाच्या दहशतीत बाजारातील वर्दळही कमी झालेली आहे.