Home क्राइम बिबट्याच्या हल्यात एक इसम जखमी,,,बल्लारपूर तालुक्याचे काटवली येथील घटना

बिबट्याच्या हल्यात एक इसम जखमी,,,बल्लारपूर तालुक्याचे काटवली येथील घटना

162
0

बिबट्याच्या हल्यात एक इसम जखमी,,,बल्लारपूर तालुक्याचे काटवली येथील घटना
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-

कोठारी वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नियत क्षेत्रातील बामणी ( काटवली ) येथिल मनोहर बुधा मडावी या इसमावर बिबट्याने हमला करून गंभीरपणे जखमी केल्याची घटना घडली असुन नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे . कोठारी पासुन अवघ्या तीन कि.मी. अंतरावर असलेल्या बामणी ( काटवली ) क्षेत्रात वाघ व बिबट्या चा संचार वाढला असुन गावात तसेच शेतशिवारात हिंस्त्र वन्यप्राण्यांचे नागरिकांना दर्शन होऊ लागले आहे . तशातच सोमवार १२ जुलै च्या रात्री ९ .०० वाजताचे दरम्यान गाव शांत झाला असता बिबट गावात शिरून मनोहर बुधा मडावी यांच्या घरातील कोबळ्यांवर ताव मारण्याचा प्रयत्न केला . मात्र झाप्यात बंदिस्त असलेल्या कोंबड्यांच्या जडफळाटाचा आवाज ऐकून मनोहर काय झाले म्हणून पाहण्याकरिता गेला . त्याचवेळी कोंबळ्यांवर झडप घेणा – या बिबट्याने मनोहर वर झडप घेतली आणि त्याला जखमी केले . गावातील घटना असल्याने , आरडाओरड केल्याने लगेच गावकरी धावून आले . व बिबट्यास हुसकावून लावले . यामुळे मोठा अनर्थ टळला . यात मनोहर बुधा मडावी वय ५५ वर्षे यास गंभीर दुखापत झाली असुन घटनेची सुचना वनक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांना देण्यात आली . जखमीस तातकाळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले . व वैद्यकीय अधिकार्याच्या सुचनेनुसार चंद्रपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे . पुढील तपास क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक सचिन टेकाम , अतिशिग्र दलाचे वनरक्षक सुनील नगारे व वनमजूर नामदेव काळे करित आहेत . या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून परत घटना घळू नये म्हणून वनविभागाच्या वतीने गस्त वाढविण्यात आली आहे .

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here