Home शैक्षणिक शाळेत या; पण सार्वजनिक वाहतूक टाळा, ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर प्रश्न

शाळेत या; पण सार्वजनिक वाहतूक टाळा, ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर प्रश्न

9
0
Tuesday, July 13, 2021
Student

Pratikar News

By

Nilesh Nagrale

वर्धा : कोरोना काळात (coronavirus) शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणाने शाळा बंद केल्या. मात्र, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असल्याने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. या आदेशात सार्वजनिक वाहतूक (public transport) टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हा आदेश शहरी विद्यार्थ्यांसाठी ठीक असला; तरी ग्रामीण विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तेथे कसे पोहोचावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. (student from rural area facing problems due to government new regulation about school)

सन २०२० या वर्षात राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर टप्याटप्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. पुन्हा लॉकडाउन जाहीर केल्याने शाळा बंद झाल्या. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शाळा बंद असल्याने त्यांच्यावर शारीरिक, मानसिक ताण आल्याचे दिसून आले. बऱ्याच कालावधीत टाळेबंदी पाळली गेल्यामुळे अध्यापन व अध्ययन प्रक्रियेमध्ये खंड पडला. त्यामुळे बाल-विवाह, बालमजुरीचे प्रमाणही वाढले.

यामुळे शासनाने १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविड-मुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामपांचायतींनी ठराव करून पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. याकरिता ग्रामपांचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष सरपंच तर सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख सदस्य याचा समावेश राहणार आहे.

या आहेत अटी –

शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना गावात कोविड रुग्ण आढळून आला नसावा. शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करावे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकाांनी करून घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरू करावेत. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करावी, त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here