Home Breaking News सुखी जीवनासाठी लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचा निर्धार करूया महापौर राखी संजय कंचर्लावार...

सुखी जीवनासाठी लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचा निर्धार करूया महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आवाहन

48
0

प्रतिकार न्युज नेटवर्क

निलेश नगराळे

चंद्रपूर : आज आपण कोरोनासारख्या भयंकर आजाराचा सामना करतोय. सामाजिक अंतर पाळणे, हे पहिले सूत्र आहे. मात्र, लोकसंख्याच इतकी मोठी आहे की सामाजिक अंतर पाळणे कठीण होत आहे. ज्या भागातील लोकसंख्या नियंत्रित असेल तिथे सुख, सोयी आणि विकास नांदतो. आरोग्य निरोगी असते. आज ज्या देशात अधिक लोकसंख्या तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला. त्यामुळे आता जगण्याची दिशा बदलली पाहिजे, हम दो, हमारा एक असा नारा देण्याची वेळ आली आहे. सुखी जीवनासाठी लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचा सर्व महिलांनी निर्धार करूया, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

उत्कृष्ट महिला महिला मंचाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, रामाळा तलाव रोड येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर स्त्रीरोगतज्ञ् डॉ. शर्मिली पोद्दार, प्रा. अश्विनी दाणी, रामनगर ठाण्याच्या पोलीस नाईका परवीन पठाण, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष दुर्गा पोटुडे, नगरसेविका छबूताई वैरागडे यांची उपस्थिती होती.
यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, वाढती लोकसंख्या हे आपल्या भारत देशासमोरील नव्हे तर संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. जगाचे क्षेत्रफळ जेवढे आहे तेवढेच आहे त्यात काहीच वाढ होत नाही. पण लोकसंख्येची वाढ प्रत्येक वर्षी भरमसाठ होत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या प्राथमिक गरजा भागवणे सरकारला सुद्धा अशक्य होते. वीज पुरवठा, पाणी पुरवठा, राहण्यासाठी जागा, आरोग्याची सेवा इत्यादी सेवा उपलब्ध करण्यात शासन, पालिका यांना अडचणी येतात. वाढत्या लोकसंख्येमुळे मानव आपल्या वास्तव्यासाठी नवीन घरे बांधण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करू लागला आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि वास्तव्य या सर्व प्राथमिक गरजांवर प्रचंड प्रमाणात ताण येऊ लागला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. साहजिकच वाढती लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण यामुळे लोकसंख्येची अन्न व निवारा यांची गरज भागविण्यासाठी जमीन, पाणी आणि जंगलसंपत्ती यावर अतोनात दडपण येत आहे. भविष्यामध्ये या साधनसंपत्तीचा तुटवडा वाढण्याची भीती महापौरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला प्रा. स्नेहल बांगडे, साक्षी कार्लेकर, प्रीती वल्लावर, वैशाली कांबळे, वंदना येरणे, वैशाली येरणे, प्रा. सारिका भुते, सुवर्णा लोखंडे, रंजना माणुसमारे, आशा बोधनकर, संध्या गोमासे, किट्टी आगळे, कविता वैरागडे, कांचन घोडमारे, कल्पना बडी आदींची उपस्थिती होती. संचालन तेजस्विनी पोटे यांनी आभार पूजा पडोळे यांनी मानले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here