Home क्राइम प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ येमूलने पिडीत महिलेचा संसार मोडण्यासाठी अघोरी कृत्याचा वापर

प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ येमूलने पिडीत महिलेचा संसार मोडण्यासाठी अघोरी कृत्याचा वापर

52
0

Pratikar News

एका उच्चशिक्षीत महिलेचा संसार उध्वस्त करण्यासाठी अघोरी कृत्य केल्याने चतुःश्रृंगी पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

प्रतिकार  न्यूज नेटवर्क :- पुणे

देशात अंधश्रद्धा आता सुद्धा मोठ्या प्रमाणात पाळली जात असून त्यात उच्चशिक्षित समाज सुद्धा गुरफटलेला असल्याचे दिसत आहे, अशाच प्रकारचे एक प्रकरण पुणे येथे उघडकीस आले असून एका उच्चशिक्षीत महिलेला सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे. दाखल गुन्ह्यात पोलिसांनी प्रसिध्द ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल याला अटक केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे कारण त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळले आहे.

यापूर्वीच चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात उद्योजक कुटुंबातील गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड, नानासाहेब शंकरराव गायकवाड नंदा नानासाहेब गायकवाड, सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे, दिपाली विरेंद्र पवार, भागीरथ पाटील आणि राजु अंकुश (रा. औंध) यांच्या यांच्यावर यापुर्वीच भादंवि कलम 498 (अ), 323, 325, 406, 420, 606, 34 सह हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

ज्योतिषी रघुनाथ येमूल यांच्यावर का झाला गुन्हा दाखल?

या प्रकरणात 27 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल असलेल्यांकडून वेळावेळी फिर्यादीला वेळावेळी मानसिक व शारीरिक त्रास होत होता. दरम्यान, ज्योतिषी रघुनाथ येमूलने पिडीत महिलेचा संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी व अघोरी कृत्याचा वापर केला. फिर्यादीच्या बेडरूमच्या बाहेर हळदी कंकू लावलेल्या टाचण्या मारलेले लिंबु ठेवले. येमुलने आरोपी गणेश यास फिर्यादी या जर तुझी बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तु आमदार ही होणार नाही व मंत्री ही होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा काढून घे असे सांगितले. येमुलने लिंबु उतरविण्यास देखील सांगितले होते. दाखल गुन्ह्यात आरोपी येमुल याचा सहभाग असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. त्याचा तपास करण्यासाठी चतुःश्रृंगी पोलिसांनी येमुलला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर देखील करण्यात आले होते.
न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करीत आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here