Home राजकारण आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा — माजी आमदार...

आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा — माजी आमदार अँड.संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले कार्यकर्त्याना आवाहन*

96
0

*आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा — माजी आमदार अँड.संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले कार्यकर्त्याना आवाहन*

*भाजपा जिवती तालुक्याची आढावा बैठक संपन्न*

आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी तालुका जिवतीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की,भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील कार्यकर्त्यांनी आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता पूर्ण शक्तीने कामाला लागण्याचे यावेळी सांगितले,भारतीय जनता पक्ष हा आपल्या भागात मजुबत असून,पक्ष संघटन,बुथ प्रमुख यांची नियुक्ती करण्यात भर द्यावी,कार्यकर्त्यांनी जनतेने प्रयत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घ्यावा, केन्द्र सरकारच्या योजना ची माहिती पोहचवावी,तसेच जिवती नगरपंचायत क्षेत्रात बुथ रचना करावी,पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्याना समावून घावे,तसेच तत्कालीन राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात झालेल्या विकास कामाची माहिती द्यावी,अश्या अनेक बाबीवर या संदर्भात उपस्थित माजी आमदार अँड धोटे व निमकर यांनी मागर्दशन केले,

या बैठकी प्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासह,उपसभापती महेश देवकते,जिल्हा उपाध्यक्ष केशवराव गिरमजी,विमुक्त भटक्या जमाती जिल्हा संयोजक सुरेशजी केंद्रे,दत्ताजी राठोड,गोपीनाथ चव्हाण,तुकाराम वरलावड,डॉ.बबन वारे,माधव निवळे, बन्सी जाधव, बुध्दाजी मेश्राम,नामदेव सलगर,अंकुश येमले, गोविंद टोकरे, पुंडलिक गिरमजी, व्यंकटी पिटलेवड, संतोष जाधव,बालाजी कारले, सचिन उत्तरवार, संजय पवार,कांशीराम राठोड,अमृतवर्षा पिळलेवार, प्रेम परकड,मनमंत वारे,विनायक राठोड, माधव कुलसंगे,निझाम मामु,नारायण वाघमारे, विजय गोतावले, बालाजी भुते,खंडू सलगर, दीपक ढगे, शिवाजी राठोड,लहू मारदेवड, शिवाजी बॉईनवड, पांढरी वाघमारे, अनिल पवार, लक्ष्मण जाधव ,बालाजी माने, वारे,अनिल राठोड,तुकाराम पवार,प्रेमसिंग राठोड,संभाजी रायवाड,शंकर केंद्रे,संग्राम बाजगिर,गोविंद मितपले,डॉ.पांडुरंग भालेरावआदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here