Home Covid- 19 जि.प.प्रा.शा.बामणवाडा.कोवीड लसीकरण केंद्रावर गर्दीच गर्दी नियोजनाचा अभाव…

जि.प.प्रा.शा.बामणवाडा.कोवीड लसीकरण केंद्रावर गर्दीच गर्दी नियोजनाचा अभाव…

12
0

जि.प.प्रा.शा.बामणवाडा.कोवीड लसीकरण केंद्र.
गडडमवारजी राजुरा: आज दिवसभरात बामणवाडा येथे जवळपास ३०० लोकांचे लसीकरण करण्यात आले.यात बाहेरील लोकांचाच सहभाग जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे. लसीकरणात कुठलाही व्यवस्थितपणा आढळून आलेला नाही.सगळ्या सेंटरवर जवळपास हीच परिस्थिती असल्याचे लक्षात आलेले आहे. पावसाळ्याचे दिवस असतांना आणि पाऊस पडत असतांना कपड्याचा पेंडाल टाकणे हे कुठल्या तत्वात बसते आहे.कुणीही जवाबदार अधिकारी सेंटरकडे फिरून परिस्थिताचा आढावा घेतांना आढळून आलेले नाहीत.ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे ओटीपी आणि रेफरन्स आयडी नंबरची नोंद घ्यावी लागत असल्याने बराचवेळ प्रतिक्षा करावी लागत होती.याची पुर्वसुचना लोकांना देणे आवश्यक होते. नागरिकांना याबाबत कुठलिही कल्पना नसल्याने ताटकळत तासनतास भर पावसात उभे रहावे लागले.याचे गांभीर्य ना आमदारांना आहे.ना अधिका-यांना आहे.ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतांनाही गर्दी होण्याचे कारण काय ? लसीकरण हे राष्ट्रीय कार्य असतांनाही लोकांची गैरसोय व्हावी याचे नवल वाटते आहे. गर्दीमुळे सर्व कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहे.यासाठी जवाबदार अधिकारी लोकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सृजन नागरिक मंच, राजुरा आपणांस करीत आहे.

आज दिवसभरात बामणवाडा येथे जवळपास ३०० लोकांचे लसीकरण करण्यात आले.यात बाहेरील लोकांचाच सहभाग जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे. लसीकरणात कुठलाही व्यवस्थितपणा आढळून आलेला नाही.सगळ्या सेंटरवर जवळपास हीच परिस्थिती असल्याचे लक्षात आलेले आहे. पावसाळ्याचे दिवस असतांना आणि पाऊस पडत असतांना कपड्याचा पेंडाल टाकणे हे कुठल्या तत्वात बसते आहे.कुणीही जवाबदार अधिकारी सेंटरकडे फिरून परिस्थिताचा आढावा घेतांना आढळून आलेले नाहीत.ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे ओटीपी आणि रेफरन्स आयडी नंबरची नोंद घ्यावी लागत असल्याने बराचवेळ प्रतिक्षा करावी लागत होती.याची पुर्वसुचना लोकांना देणे आवश्यक होते. नागरिकांना याबाबत कुठलिही कल्पना नसल्याने ताटकळत तासनतास भर पावसात उभे रहावे लागले.याचे गांभीर्य ना आमदारांना आहे.ना अधिका-यांना आहे.ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतांनाही गर्दी होण्याचे कारण काय ? लसीकरण हे राष्ट्रीय कार्य असतांनाही लोकांची गैरसोय व्हावी याचे नवल वाटते आहे. गर्दीमुळे सर्व कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहे.यासाठी जवाबदार अधिकारी लोकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सृजन नागरिक मंच, राजुरा आपणांस करीत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here