Home क्राइम चक्क ,पैशांसाठी मृत रूग्ण जिवंत असल्याचं भासवून दोन दिवस मृतदेहावर उपचार केल्याचा...

चक्क ,पैशांसाठी मृत रूग्ण जिवंत असल्याचं भासवून दोन दिवस मृतदेहावर उपचार केल्याचा प्रकार

55
0

Pratikar News

सांगलीतला धक्कादायक प्रकार

प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केली डॉक्टरला अटक

मृत रूग्ण जिवंत असल्याचं भासवून दोन दिवस मृतदेहावर उपचार केल्याचा प्रकार सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक आणि मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी इस्लामपूरमधल्या आधार हेल्थ केअरचे डॉक्टर रंगराव वाठारकर याला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. वाठारकर विरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एका डॉक्टरने हा अस प्रकार केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सायरा हमीद शेख या महिलेला मेंदू पक्षाघातावरील उपचारांसाठी 24 फेब्रुवारीला इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेवर उपचार सुरू असताना 8 मार्चला झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे. मात्र डॉक्टरांनी या महिलेचा मृतदेह 10 मार्चला ताब्यात दिला. नेमकं दोन दिवस काय झालं? ही परिस्थिती जाणून घेतल्यानंतर डॉक्टरांविरोधात सायरा यांच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला.
नगरपालिका नोंदणी विभागात सायरा यांचा मृत्यू 8 मार्चला सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी झाला असल्याची नोंद आहे. मात्र 10 मार्चला त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. या प्रकाराचा सायरा यांच्या नातेवाईकांना संशय आला त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली.
पोलिसांनी तपास केला असता सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करण्यात आल्याचं समोर आलं. डॉक्टर योगेश वाठारकर याने बनावट कागदपत्रं तयार करून 41 हजार 289 इतके ज्यादा बिल तयार केल्याचंही निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत डॉक्टर योगेश वाठारकरला अटक केली आहे.
आईच्या उपचराबाबत दोन दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती असं सायरा यांचा मुलगा सलीमने म्हटलं आहे.. सायरा यांचा मुलगा सलीम यांना 10 मार्च पर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून 41 हजार 289 इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भा.दं.वि.कलम 406, 420, 464, 297 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here