Home शैक्षणिक शाळा बंद क्लासेस सुरू, शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना होवू शकतो,...

शाळा बंद क्लासेस सुरू, शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना होवू शकतो, क्लासेसमध्ये करोना होत नाही का …?

44
0

Pratikar News

 शाळा बंद क्लासेस सुरू

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण न घेवू देण्याचा विचार करतय काय सरकार … ?

शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना होवू शकतो, क्लासेसमध्ये करोना होत नाही का …?

(प्रतिकार न्यूज नेटवर्क -निलेश नगराळे ) 

बीड : गेले शैक्षणिक वर्ष ऑनलाइन शिक्षणात गेले. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात तरी शाळा सुरू होतील अशी पालकांना अपेक्षा होती. मात्र १६ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी शाळा बंद ऑनलाइन शिक्षण सुरू अशी परिस्थिती आहे. शाळा बंद असल्या तरी खाजगी क्लासेस मात्र सध्या सर्रास सुरू आहे. शासनाचे बंधन शाळांना असून क्लासेवर कोणाचे नियंत्रण नाही. शाळेत विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, मग खाजगी क्लासेस मध्ये होत नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे राज्यशासनाने मार्च २०२० पासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून शाळांना घरघर लागली आहे. कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी शाळा सुरू ठेवणे आवश्यक आहे. यामुळे राज्य शासनाने शाळा बंद ऑनलाईन शिक्षण हा उपक्रम सुरू केला.

विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत नसले तरी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. जून 2020 ला पुन्हा नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन शिक्षण पध्दतीने सुरू केले . नोव्हेंबर 2020 ला नववी ते बारावी वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले. तर फेब्रुवारी 2021 ला पाचवी ते बारावी चे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले. मात्र पहिली ते चौथी चे वर्ग गेल्या वर्षी सुरू होऊ शकले नाही. गेल्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू राहिले. यातील अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल नसने, रेंज नसने व इतर कारणामुळे ऑनलाईन शिक्षणापासून दूर राहावे लागले. या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नाही. त्यामुळे शासनाने 16 जून पासून 2021 – 2022 हे शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. ऑफलाइन शाळा अथवा क्लासेस सुरु करण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे शाळा ऑनलाइन सुरू झाल्या, मात्र खाजगी क्लासेसवर कोणाचेच नियंत्रण नसलेल्या क्लासेस वाल्यांनी सर्रास क्लासेस सुरू केले आहेत.

शाळा बंद क्लासेस सुरू अशी सध्याची परिस्थिती आहे. शिवाय एका क्लासमध्ये विद्यार्थी भरले जातात. या क्लासेवाल्यांना शासनाचे अथवा शिक्षण विभागाची कोणाचे बंधन नाही. शाळेत विद्यार्थी एकत्र आल्यावर कोरोना होऊ शकतो. तर क्लासेस मध्ये विद्यार्थी गेल्यावर कोरोना होणार नाही का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गतवर्षी क्लासेस वर्षभर सुरू होते. मात्र शाळा बंद होत्या. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात क्लासेस सुरू झाले आहेत. मात्र शाळा बंद आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांना कोरोना चा प्रादुर्भाव होवू शकतो क्लासेसच्या विद्यार्थ्यांना नाही का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here