Home राजकारण भाजपा राजुरा शहराची आढावा बैठक संपन्न* *माजी आमदार अँड संजय धोटे...

भाजपा राजुरा शहराची आढावा बैठक संपन्न* *माजी आमदार अँड संजय धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती*

81
0

*भाजपा राजुरा शहराची आढावा बैठक संपन्न*

*माजी आमदार अँड संजय धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती*

आगामी राजुरा नगर परिषद निवडणूक तसेच वार्डनिय आढावा बैठक व बुथ समित्या,आगामी काळात पक्ष संघटन तसेच विविध पक्षातील लोकांना पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या मार्गदशनाखाली व त्यांच्या उपस्थितीत भाजपा राजुरा शहराची आढावा बैठक राजुरा विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.याबैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली,राजुरा नगर परिषद निवडणुकीत इच्छुक उमेदवार यांची मुलाखत घेऊन माहिती घेणे,वार्डनिय बैठकीचे आयोजन करून वार्डातील संघटन संदर्भात शाखा गठीत करणे,विविध पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश करून घेणे,मतदार यादीचे वाचन करून नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे,तसेच निवडणुकीसदर्भात ईतर महत्वाची माहिती घेणे अश्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी वर चर्चा करण्यात आली,

यापूर्वी मागील निवडणुकीत तीन नगर सेवक निवडून आले .चार वर्षात काय दिवे लावले ते त्यांनी सांगावे ,विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी करता आली असती पण तसे झाले नाही.25 कोटी रुपये  खर्च केल्याचे 25 जानेवारी 2021 ला अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मग या तीन नगर सेवकांच्या परिसरात किती खरच केला .त्याची माहिती पण द्यायला पाहिजे,

 

माजी आमदार अँड संजय धोटे यांनी या बैठकी प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,मागील निवडणूकीत आपण काही मताने कमी पडलो असलेतरी पूर्ण ताकतीने लढलो,त्यापेक्षाही या निवडणुकीत आपण एकजुटीने व पूर्ण शक्तीने लढलो तरी ही निवडणूक आपण सहज जिंकू शकतो,प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या वार्डात नवीन शाखा गठीत करून युवा वर्गांना पक्षात स्थान द्यावा व त्यांना पक्षाची जबाबदारी द्यावी,भारतीय जनता पक्ष हा देशातला सर्वात मोठा पक्ष असून,या पक्षात कार्यकर्त्यांची मोठी फळी असून याचा फायदा आगामी होणाऱ्या निवडणुकीत याचा फायदा पक्षाला होणार असल्याचे यावेळी बोलताना आपले मत व्यक्त केले,बैठकी प्रसंगी जेष्ठ सिनेअभिनेते स्व.श्री.दिलीप कुमारजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्यामंत्र्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला,बैठकीचे प्रस्ताविक भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे यांनी केले.

बैठीक प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपचे जेष्ठ नेते अरुण मस्की,भाजपा जिल्हा सचिव हरिदास झाडे,नगर सेवक राधेश्याम अडानिया,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजपा नेते महादेव तपासे,ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,सुरेश रागीट,मिलिंद देशकर,गणेश रेकलवार,मंगेश श्रीराम,विलास खिरटकर,जनार्धन निकोडे,कैलास कार्लेकर,महेश रेगुंडवार, संदीप मडावी,रमेश मेश्राम, सुनिल पायपरे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here