Home Breaking News “परमिशन” मिळविण्यासाठी होत आहे पोलिस विभागाशी “सेटींग, जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर...

“परमिशन” मिळविण्यासाठी होत आहे पोलिस विभागाशी “सेटींग, जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर “अवैध दारू विक्रेते” वळलेत सट्टा व जुगार अड्ड्याकडे ?

14
0
Pratikar News
Nilesh Nagrale

परमिशन” मिळविण्यासाठी होत आहे पोलिस विभागाशी “सेटींग”?

काही झाले “मालामाल” तर काही “कर्जाने बेजार”!

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारू विक्रीचे परवाने नूतनीकरण झाल्यानंतर सोमवार दिनांक 5 जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यात परमिट रूम, देशी दारूची दुकाने अधिकृतपणे सुरू झाली आहेत. अधिकृतपणे दारू विक्री सुरू झाल्यानंतर दारूबंदी असताना दारू विक्रीच्या व्यवसायात सक्रिय झालेले दारू विक्रेते आता अन्य गैरमार्गाकडे वळत असताना दिसत आहे. दारूबंदी नंतर जिल्ह्यामध्ये पन्नास हजाराच्या जवळपास लोकांवर दारू अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची आकडेवारी आहे. जुलैपासून हे अवैध दारू विक्रेते आता बेरोजगार झाले असून त्यांनी आपली वाट बदलविण्यासाठी हातपाय मारणे सुरू केले असून जिल्ह्यात सट्टा व जुगार अड्डे चालविण्याकडे त्यांचा भर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील काहींनी यासाठी आपल्या जुन्या संपर्काच्या आधारावर “पोलिस विभागा”शी संपर्क साधत यासाठी “परमिशन” मिळविण्यासाठी हातपाय मारण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
काय आहे हि “परमिशन” ?
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर काही मोठ्या व्यापाऱ्यांना जिल्ह्यांमध्ये दारूच्या पुरवठा करण्याची अनधिकृतपणे लायसन्स देण्यात आले होते त्या कामी जिल्ह्यातील पोलीस विभागातील काही बेईमान पोलीस अधिकाऱ्यांनी मी पुढाकार घेतला होता. ज्यांना लेन-देन च्या माध्यमातून अनधिकृत परवानगी देण्यात आली होती. त्याच पण अधिकृत परवानगी ला “परमिशन” असे संबोधल्या जात होते. मग या परमिशन असणाऱ्यांच्या “मोहल्ला कमेट्या” व “डीलर शिप” देण्यात येत होती. त्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल जी देशमुख यांना जिल्ह्यातून निवेदनही देण्यात आले होते. या “परमिशन” धारकांनी व काही बेईमान पोलिसांनी दारू विक्री दरम्यान अमाप पैसा कमावला. आता हीच “परवानगी-परमिशन” मिळविण्यासाठी तेव्हाची दारू विक्रेते कामाला लागले असून त्यांची हितसंबंध याकामी त्यांना अवश्य मदत करतील असे सांगितले जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या काही दिवसात सट्टा व्यवसायिक व ुगार अड्डे चालविणार्‍या जी संख्या मोठ्या प्रमाणात दिसणार असे आता बोलले जात आहे.

दारू विक्रीतून काही झाले “मालामाल” तर काही झाले “कर्जाने बेजार”!

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर दारूबंदी काळात तब्येत दारूविक्री हाच आपला अधिकृत व्यवसाय मानणारे काही दारू विक्रेते “मालामाल” झाले तर काही “कर्जाने बेजार” झाले आहेत. जे मालामाल झाले ते बाकी है व्यवसायात आपले हातपाय पसरण्यास आता सक्रिय झाली असून कर्जबाजारी आहेत त्यांच्या मागे कर्जाच्या तकाजा व कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, “जसे कर्म, तसे फळ” म्हणतात ते बहुतेक यालाच!

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here