विरुर/ प्रतिकार प्रतिनिधी…
राजुरा वनपरिक्षेत्रात वावरणाऱ्या आरटी 1 नरभक्षी वाघाला ठार मारण्याची सरकारने परवानगी द्यावी, यासह वाघाने बळी घेतलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला वनविभागात नौकरी द्यावी आणि साप हा वन्य प्राणी असल्यामुळे साप चावून मारणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला इतर वन्य प्राण्यांप्रमाणे आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर ला दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत विरुर स्टेशन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन होणार आहे.
शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस यांचेसह अनेक नेते या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विरुर स्टेशन शेतकरी संघटनेने केले आहे.
प्रतिकार न्युज
बातम्या जाहिरात करिता
सम्पर्क 7038636121