Home आपला जिल्हा कविता कन्नाके च्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा*- वैशाली बुद्दलवार *कोठारीत निषेध मोर्चाचे...

कविता कन्नाके च्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा*- वैशाली बुद्दलवार *कोठारीत निषेध मोर्चाचे आयोजन

263
0

*कविता कन्नाके च्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा*- वैशाली बुद्दलवार
*कोठारीत निषेध मोर्चाचे आयोजन
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार )*
कोठारी पोलीस स्टेशनचे हद्दीत ३० जून चे रात्री १० वाजता .चे दरम्यान कोठारी येथील कविता गंगाधर कन्नाके हिची निर्घृण हत्या तिचा पती गंगाधर व त्याचे दोन मित्रानी केली.त्याच्या निषेधार्थ कोठारी पोलीस स्टेशनवर मोर्चा करण्यात आला.मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यां वैशाली बुध्यालवार यांनी केली.निषेध मोर्चात अल्का ताई आत्राम भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर,रेणुका दुधे भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रेयसीच्या प्रेमापोटी स्वतःच्या पत्नीचा पतीनेच कट रचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.३० जून च्या रात्री पती गंगाधर व त्याची नऊ महिन्याची गरोदर पत्नी कविता चिमुरहून कोठारीकडे येत असतांना कोठारी व दहेली येथील आपल्या दोन मित्रांना उमरी फाट्यावर बोलावून कवडजाई रस्त्यावरील पुलाजवळ हत्या केली आणि रानटी डुक्कराने दुचाकीस धडक दिल्याने अपघात झाला असा बनाम करून राहत्या घरी प्रेत आणले.सपघातात पत्नी मरण पावली असे नातेवाईकांना सांगून बोलाविले.नातेवाईकांनी प्रेताची पाहणी केल्यानंतर हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करीत कोठारी पोलीस स्टेशन गाठले.व तक्रार दाखल केली.
कोठारीचे ठाणेदार यांनी घडलेल्या प्रकारची शहानिशा करून मृतक कवितांचा पती गंगाधर कन्नाके,राजकुमार कन्नाके व शंकर गंधमवार यांना चोवीस तासात कारवाई करीत अटक केली. मृतक कविता नऊ महिन्याची गरोदर माता असून तिला दोन वर्षांची तुरटी नामक मुलगी आहे. कविता काही दिवसातच बाळतीन होणार होती आशा बिकट अवस्थेत तिला दुचाकीवर बसवून घेऊन जाणे व तिची निर्घृण हत्या केली.ही माणुसकीला काळिमा फासणारी व महिलांच्या अस्मितेला धोका निर्माण करणारी घटना असून अशा विकृत मानसिकतेच्या मारेकऱ्यांना माफी नकोच .त्यांचेवर कडक शिक्षा व्हावी ही समाजमनाची मागणी असून पोलीस या प्रकरणात योग्य तपास करून मृतकाला न्याय द्यावा अशी मोर्चाद्वारे मागणी करण्यात आली.
कोठारी आनंदनगर येथून मोर्चा सुरू करण्यात आला.निषेधाच्या घोषणा देत मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी मोर्चेकरी करीत होते.मोर्चा कोठारी पोलीस स्टेशन ला नेण्यात आला.मोरच्यांचे नेतृत्व वैशाली बुद्दलवार,अल्काताई आत्राम ,रेणुका दुधे यांनी केले.ग्राप सदस्य स्नेहल टिम्बडिया,शोभाताई वडघणे,सुचिता गाले, अल्पोन्सा परचके सह शेकडो महिला ,पुरुष मोर्च्यात सहभागी झाले होते.मागणीचे निवेदन नायब तहसीलदार कुळसंगे,ठाणेदार तुषार चव्हाण,तलाठी महादेव कन्नाके यांना देण्यात आले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here