Home Breaking News चंद्रपूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रेस-नोट जाहिर ! ९८ अनुज्ञप्त्यांमध्ये १...

चंद्रपूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रेस-नोट जाहिर ! ९८ अनुज्ञप्त्यांमध्ये १ वाईन शॉप, ६४ परमिट रूम, १ क्लब, ६ बिअर शॉप, २६ देशी दारू किरकोळ विक्री

127
0

Pratikar News

चंद्रपूर : आज सोमवार दि. ५ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात वैध दारूची विक्री करण्यात आली. महत्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आज ५ जुलै ला दारू विक्रीचे एकंदर नुतनीकरण झालेल्या एकंदर ९८ परवाना धारकांना दारू विक्रीची पोचपावती देण्यात आली. परवाना धारकांनी आपल्या दुकानांसमोर दारू विक्री सुरू असे बोर्ड लावून सकाळी ७ ते सायं. ४ पर्यंत दारू विक्री सुरू असल्याचे दर्शनी भागात फलक लावले, त्यामुळे मद्यपींनी दारू दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली परंतु शनिवार आणि रविवार लॉकडाऊन मुळे दुकाने बंद असल्यामुळे चंद्रपूरात दारू चा साठा दुपारी २ वाजेपर्यंत आलाचं नाही. त्यामुळे नुतनीकरण झालेल्या परवानाधारकांच्या दुकानात मद्यपींनी भयानक गर्दी केली. दपारी २ नंतर परमिट रूम मध्ये दारू ची विक्री करण्यात आली. जमलेली मद्यपींची भिड हे बेकाबु झाल्यामुळे बंगाली कॅम्प परिसरातील एका बारमध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याची माहिती आहे. गर्दी चा फायदा घेत काही परमिट धारकांनी जादा दरात दारू ची विक्री केल्याचा आरोप मद्यपी करीत आहेत. विविध बँड च्या दारूचे दर बार किंवा शॉप च्या दर्शनी भागात लावण्यात यायला हवे अशी मागणी ही काही मद्यपींनी केली आहे. जिल्ह्यात आजपासून सुरू झालेल्या दारू विक्रीचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून गर्दी तथा मद्यपींचे अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांवर फिरत आहेत.
चंद्रपूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रेस-नोट जाहिर !
आज ५ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धोमकर यांच्या स्वाक्षरीने एक प्रेस नोट पत्रकारांसाठी जारी करण्यात आली परंतु अनेकांना ती वृत्त लिहीस्तोवर मिळाली नाही. जारी केलेल्या या प्रेस नोट मध्ये
आवश्यक शुल्क आकारून व चौकशी करून तसेच कागदपत्रांची पडताळणी करून अशा अनुज्ञप्त्या राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपर यांनी मा. जिल्हाधिकारी महोदय, चंद्रपूर यांच्या मान्यतेने देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. १८ जुन पासून प्राप्त झालेल्या अशा अर्जावर कागदपत्रांची पडताळणी करून २ जलै रोजी एकण ९८ विविध प्रकारच्या मद्यविक्री पूर्ववत चालू करण्यात आदेश करण्यात आले आहे. अनुज्ञप्त्या धारकांचे व्यवहार नियमानुसार सुरू करणेबाबत आवश्यक सुचना चंद्रपूर विभाग, वरो व राजुरा विभाग येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यांना देण्यात आले आहेत. या ९८ अनुज्ञप्त्यांमध्ये १ वाईन शॉप, ६४ परमिट रूम, १ क्लब, ६ बिअर शॉप, २६ देशी दारू किरकोळ विक्री असे आहेत.
 
आत्तापावेतो ३०३ अर्ज प्राप्त, २८० प्रकरणांची चौकशी व १६८ अहवाल प्राप्त !
 
आज ५ जुलै रोजी ९८ अनुज्ञप्तीधारकांना दारू विक्री ची परवानगी देण्यात आली असून ६ जुलै ला पुन्हा ७० च्या वर परवानाधारकांची परवानगी मंजुर होणार असल्याची अधिकृत माहिती आहे. त्याव्यतिरिक्त अर्जधारकांच्या परवानग्या मंजूर करण्याची प्रक्रिया जलद गतीने चालू ठेवण्यात येइल व प्राप्त अर्जावर लवकरचं निर्णय घेण्यात येणार असल्याचे या प्रेस नोट मध्ये नमुद करण्यात आले आहे.
आज मद्यपींनी दारू दुकानांसमोर केलेली गर्दी, उशिरा आलेला दारूसाठा व ज्यादा दरात विक्री करण्यात आलेले मद्य तसेच विविध भागातून सोशल मिडीयावर आलेले व्हिडीओ व फोटो हा जिल्ह्यात चर्चेचा विषय होता.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here