प्रतिकार..
प्रतिनिधी…
चंद्रपूर…
चंद्रपुर च्या दीक्षाभूमि तर 16 ऑक्टो.धम्मचक्र प्रवर्तन दिनी,बजाज परिवार यानी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा…..*
16 ऑक्टोम्बर 1956 ला डॉ बाबासाहेब आम्बेडकर यानी आपल्या लाखो अनुयायी ना चंद्रपुर येथील दीक्षाभूमिवर बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती.तेव्हा पासून 15,16 ऑक्टोम्बर ला धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त चंद्रपुर च्या पवित्र दीक्षाभूमिवर दरवर्षी लाखो लोक येत असतात.या भूमिवर नतमस्तक होतात,तथागत भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांचे विचारांचे हजारो रूपयाचे पुस्तके आणि जीवन जगण्याची ऊर्जा घेऊन जातात.
या वर्षी कोविड-19 या बीमारी मुळे दीक्षाभूमिवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले होते.तरी पन काही लोक या भूमिवर जावून वंदन करून येत होते.भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दल चे पदाधिकारी अभिवादन करण्या करिता या पवित्र दीक्षाभूमि वर आलेले होते.याच ठिकाणी आद जय बजाज आणि त्याचा परिवार पहिलेच उपस्तित होता.त्यानी या दीक्षाभूमिवर आजच्या पवित्र दिनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची इच्छया व्यक्त केली.आद कृष्णाक पेरकावार,भारतीय बौद्ध महासभा चे जिल्ह्य सचिव तथा वरिष्ट केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य यानी दीक्षाभूमिवरील उपस्तित असलेल्या जनसमुदाय समोर आद जय बजाज आणि त्याचे परिवारतील पांच लोकांना, त्रिशरण पंचशील व 22 प्रतिधन्या देवून बौद्ध धम्माची दीक्षा दिली.सर्व जनसमुदायनी या परिवार चे पुष्पाचा वर्षाव करून स्वागत केले,भारतीय बौद्ध महासभा च्या सर्व पदाधिकारी यानी पुष्प देऊन स्वागत केले, भारतीय बौद्ध महासभा च्या सर्व महिलानी भारतीय संविधान पुस्तक देवून तसेच डी पी जाम्भूलकर या परिवार नी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ देऊन त्याचे स्वागत केले.
या प्रसंगी दीक्षाभूमिवर आद वामन सरदार विभागीय सचिव भा बो म ,आद नेताजी भरने जिल्हाध्यक्ष, ऍड जगदीप खोब्रागडे जिल्ह्यसरचिटणीस,आद अशोक पेरकावर मेजर समता सैनिक दल, आद प्रफुल भगत जिल्ह्यउपाध्यक्ष सरंक्षण विभाग,आद संदीप सोनोने जिल्ह्य उपाध्यक्ष संस्कार विभाग,आयु.नि. सपना कुंभारे जिल्ह्य उपाध्यक्ष प्रचार पर्यटन,आयु.नि. सुजाता लाटकर जिल्ह्य उपाध्यक्षा महिला विभाग, ,डॉ विनोद फुलझेले अध्यक्ष चंद्रपुर शहर,ऍड सचिन उमरे सरचिटणीस,आद भाऊराव दुर्योधन उपाध्यक्ष संस्कार,आयु.नि. जासवंती माउलिकर उपाध्यक्षा महिला,आद जी एस फुलझेले अध्यक्ष चंद्रपुर तालुका,आद किशोर तेलतुंबडे साहेब, आद सौरज बोरकर साहेब,ऍड पूनमचंद वाकड़े उपस्तित होते .
प्रतिकार. न्यूज
बातम्या जाहिरात करिता
सम्पर्क. 7038636121