Pratikar News
मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरच्या भौराकलां पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नात्यांमधील सर्व मर्यादा तुटून नात्याला कलंक लागला आहे. येथे एका ५० वर्षीय सासून तिच्या २५ वर्षीय जावयासोबत प्रेमविवाह केला.
मात्र या महिलेचा पती आणि मुलीने या प्रकाराला विरोध केल्याने कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन शांतता भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली.
भौराकलां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या एका महिलेने तिच्या मुलीचा विवाह करून दिला होता. मात्र विवाहानंतर ही महिला जावयाच्या प्रेमात पडली. या प्रेम प्रकरणामुळे सासू आणि जावई दहा महिन्यांपूर्वी घरातून फरार झाले. कुटुंबीयांनी ते फरार झाल्यानंतर कुठलीही तक्रार दिली नाही. दरम्यान, दहा महिन्यांनंतर ते परत आले. तेव्हा त्यांनी आपण कोर्ट मॅरेज केल्याचे सांगितले. मात्र त्याल महिलेचा पती आणि मुलीने आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस या दोघांना ठाण्यात घेऊन आले. तिथेही ते एकमेकांसोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेऊ लागले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
दरम्यान, सासूने आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या जावयासोबत विवाह केल्याचे प्रकरण आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणी दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांच्यापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांमधील नाते हे कलंकित करणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान भौराकलां पोलीस ठाण्यातील ठाणाध्यक्ष जितेंद्र तेवटिया यांनी सांगितले की, एका सासूने तिच्या जावयासोबत विवाह केल्याची आणि ते जबरदस्तीने घरात घुसल्याची माहिती आम्हाल मिळाली होती. त्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन संबंधितांना समवजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सासू आणि जावयाने एकमेकांपासून वेगळे होण्यास नकार दिला. तेव्हा आम्ही त्यांना दंड ठोठावला.