Home आपला जिल्हा भेंडाळा ग्रामपंचायत च्या वतीने निषेध व्यक्त करीत छेडले आंदोलन*

भेंडाळा ग्रामपंचायत च्या वतीने निषेध व्यक्त करीत छेडले आंदोलन*

106
0

*भेंडाळा ग्रामपंचायत च्या वतीने निषेध व्यक्त करीत छेडले आंदोलन*

✍️ सुखसागर झाडे गडचिरोली:-

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून विकास कामे सोडून ग्रामपंचायतींना पाहिले पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल भरण्याबाबतचा ग्रामविकास विभागाने २३ जून २०२१ रोजी काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा.
15 व्या वित्त आयोगातून केंद्रसरकार ग्रामपंचायतींना विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. त्या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे केली जातात. ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम ग्रामपंचायतीला जोडणारे रस्ते, पाण्याचा निचरा, पाण्याचे व्यवस्थापन, एलेडी ब्लब, साहित्य खरेदी अशा विविध कामांसाठी 15 व्या केंद्रीय वित्त आयोगातून निधी मिळत असतो.
परंतु राज्य सरकारने या निधीवर आपला डोळा ठेवून याविकास कामांचा निधी पथदिवे व पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिल भरणा करण्यासाठी करावा असा जीआर काढला आहे. यातून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीचा गैरवापर करण्याचा हा प्रयत्न आहे. आज 1जुलै रोजी भेंडाळा ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र सरकाने वीज बिल ग्रामपंचायत ने भरण्यासाठी काढलले शासन निर्णयविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच कुंदाताई जुवारे, उपसरपंच विठ्ठल सातपुते, सदस्य संजय चलाख, निखिल उंदीरवाडे, ज्योती नंदेशर, कुसुम उंदीरवाडे, गीता तुमडे, वर्षा सातपुते, तथा ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here