Home Breaking News नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

16
0

Pratikar News

By
Nilesh Nagrale

नागपूर : पतीचे निधन झाल्यानंतर उद्भवलेल्या कौटुंबिक वादाची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविण्यासाठी आलेल्या विधवेला (torture widow) सहकार्य करण्याचे आमिष दाखवून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार (Sub-inspector-of-police-raped) केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजबहाद्दूरसिंह दीनदयाल चौहान असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. (Police-sub-inspector-torture-widow)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया (काल्पनिक नाव) ही गिट्टीखदान परिसरात राहते. तिला दोन मुली आहेत. तिच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले. पतीच्या निधनानंतर सासरी राहताना तिला कौटुंबिक त्रास व्हायचा. नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळून रियाने पोलिसांत तक्रार करण्याचे ठरवले.

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राजबहाद्दूरसिंह चौहान याने तिला थांबवून विचारपूस केली आणि लिफ्ट दिली. त्याने तिला पोलिस ठाण्यात सोडून दिले आणि मोबाईल नंबरची मागणी केली. तिने मोबाईल नंबर आणि घराचा पत्ता सांगितला. राजबहाद्दूरसिंह याने नागपूर पोलिस दलात अधिकारी असल्याचे सांगून सासुरवाडीतील त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे आमिष दाखवले.

एकाकी असलेल्या महिलेला पोलिस अधिकारी मदत करीत असल्याने चिंता मिटली. दुसऱ्याच दिवशी राजबहाद्दूरसिंह महिलेच्या घरी गेला. वर्दीवर आल्याने त्याने महिलेच्या कुटुंबीयांना पुन्हा त्रास न देण्याबाबत दम भरला. पोलिसाच्या धमकीमुळे कुटुंबीय घाबरले. त्यांनी रियाला कोणताही त्रास ने देता संपत्तीतील तिचा वाटा दिला.

पीएसआयने ओढले जाळ्यात

पीएसआय राजबहाद्दूर सिंह वारंवार महिलेच्या घरी यायला लागला. येताना दोन्ही मुलींसाठी खाऊ, फळे आणि काही किराणा सामानही आणायचा. हळूहळू त्याने महिलेच्या एकाकीपणाचा फायदा घेत सलगी केली. तिलाही पतीच्या निधनानंतर आणि सासरच्या कुटुंबीयांच्या त्रासापासून वाचण्यासाठी त्याची मदत होत होती. पीएसआयने तिला घटस्फोटित असल्याचे सांगून दोन्ही मुलींचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवले.

अचानक झाला गायब

राजबहाद्दूर सिंह याने रियाशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्या घरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागला. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. परंतु, राजबहाद्दूर विवाहित असून, त्याला दोन मुलं असल्याचे तिला कळले. त्यामुळे तिने त्याच्यापासून दुरावा केला. मात्र, तो वर्दीचा धाक दाखवून घरी बळजबरीने राहू लागला. तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. मुलींना मारहाण करायचा. पोलिस दलातून सेवानिवृत्त होताच त्याने तिच्या घरातून पळ काढला.

(Police-sub-inspector-torture-widow)

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here