Pratikar News
चंद्रपूर, ता. ३० : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने एकता गणेश मंडळ, छत्रपती नगर, शास्त्रीनगर प्रभाग क्र. २. चंद्रपूर येथे दिनांक १ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीरभाऊ मुनंगटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी संजय कंचर्लावार राहतील.
याप्रसंगी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदिप आवारी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती चंद्रकलाताई सोयाम, उपसभापती पुष्पाताई उराडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या उपक्रमाचे आयोजन शास्त्रीनगर प्रभाग क्र. २ नगरसेवक सोपान गेनभाऊ वायकर, नगरसेविका वनिता विठ्ठलराव डुकरे, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेवक सुरेश पचारे यांनी केले आहे.