Home Breaking News सुगंधित तंबाखुवर बंदी असतांना मात्र चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम तस्करी..!

सुगंधित तंबाखुवर बंदी असतांना मात्र चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम तस्करी..!

12
0

Pratikar News

  • प्रशासनाने गांभिर्याने घेण्याची गरज.

✍️ निलेश नगराळे 

चंद्रपुर,३० जून २०२१ :

महाराष्ट्रात सुगंधित तंबाखुच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असतांना जिल्ह्यातच नव्हे तर तालुक्यातील ग्रामिण क्षेत्रात सुध्दा व कोविड महामारी असूनही खुलेआम तंबाखु आणि तंबाखु मिश्रित खर्रा सर्रासपणे विकल्या जात आहे. मात्र याकडे खाद्य आणि औषधी प्रशासन विभागाकडून साफ दुर्लक्ष केल्या जात आहे.

तंबाखुचे सेवन केल्याने मनुष्याच्या आराेग्यावर विपरित परिणाम हाेवू शकताे त्यामुळे राज्य सरकार च्या वतीने सुगंधीत तंबाखु च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. काेविड हा आजार थुंकण्यामुळे वाढत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने या संदर्भात कडक आदेश लागु केले आहे. तरी सुध्दा तंबाखु तस्कर तंबाखु ची विक्री करून काेविड आजाराचा संसर्ग वाढवण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.

जिल्ह्यातील शासकिय कर्मचारी त्यांचे कार्यालयात तंबाखु मिश्रित खर्रा सेवन करतांना दिसुन येतात. सरकारी कार्यालयाच्या बाथरूम, वाशबेसिन,भींतीवरच्या काेपऱ्या कोपऱ्यात खर्रा खाऊन पचापचा थुंकून भींती रंगवून ठेवल्याचे दिसुन येते. तंबाखू तस्कर हे अधीक पैसै कमावण्याच्या लालसेपाेटी नकली तंबाखु तयार करून विकल्या जात असल्याची चर्चा जनतेत हाेतांना दिसत आहे. परंतु खाद्य आणि औषधी प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्षच देत नसल्याचे दिसून येते. राज्य सरकार जनतेच्या हिताचा विचार करत कायदा लागु करतात पण त्या कायद्याची प्रामाणिकपणे अमलबजावनी हाेत नाही. प्रशासनातील काही अधिका-यांच्या सुस्तपणाने कायद्याचे नेहमीच उलंघन केल्या जात असुन यामुळे सरकारी याेजना विफल हाेतांना दिसतात. तंबाखु बंदी च्या नियमात हेच हाेतांना दिसुन येते. सार्वजनिक परिसरात तंबाखु व धुम्रपान करण्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे प्रावधान आहे व ते असायलाही पाहिजे, जसे की बस स्थानक, रेल्वे स्टेशन, या सार्वजनिक ठीकानी सर्रासपणे नियमांचे उलंघन होतांना दिसते. अश्या लाेकांवर कारवाई करण्याचे कुठलेच आदेश नसुन ज्या अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याचे अधिकार असतात ते त्या ठिकाणी कधी भिरकतही नसल्याचे माहिती आहे. या सर्व गोष्टींना कारणीभूत अवैध सुगंधीत तंबाखुची होणारी तस्करी असल्याचे निदर्शनास येतांना दिसत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here