Home विशेष baby adoption: मुलं दत्तक घ्यायचे आहे? वाचा संपूर्ण प्रक्रिया

baby adoption: मुलं दत्तक घ्यायचे आहे? वाचा संपूर्ण प्रक्रिया

37
0

Pratikar News
Wednesday, June 30, 2021
By
नीलेश नगराळे, नागपूर

नागपूर : लग्नानंतर घाई असते मुलाची. कारण, पती-पत्नीच्या जीवनाला मुलं पूर्ण करीत असतात. यामुळे जुने लोक लग्नानंतर ‘लवकर मुलगा होऊ दे’ असा आग्रह सुनेकडे धरत असायचे. मात्र, आजच्या युगात याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. लग्नानंतर चार ते पाच वर्ष मुलं होऊ न देण्याचा निर्णय दाम्पत्य घेत (adopt children) असतात. यानंतर प्रयत्न केले तरी बाळ होत नाही. तर अनेकांना वंध्यत्वामुळे मुलं होत नाही. अशावेळी मुलं दत्तक घेण्याचा विचार मनात येतो. मात्र, सविस्तर माहिती नसल्याने अडचण येते. तर काय आहे मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया (The process of adopting children) हे जाणून घेऊ या… (Want-to-adopt-children?-So-read-the-whole-process)

वंध्यत्वामुळे किंवा अन्य करणामुळे नवदाम्पत्याला मुलं न होण्याचे प्रमाण अधिक आहे. शरीरात कोणत्यातरी गुणाची कमी असल्यास मुलं होण्यास अडचण निर्माण होत असते. अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतरही अनेकांना मुलं होत नाही. तर अनेक महिलांमध्ये गर्भपीशवीच राहत नाही. तर काही दाम्पत्य असे असतात ज्यांना लग्नाच्या दहा ते पंधरा वर्षांनंतरही मुलं होत नाही

पूर्वी मुलं न झाल्याने पुरुष दुसरा विवाह करायचा. चूक कोणाचीही असो शिक्षा मात्र महिलेलाच मिळायची. मात्र, आता तसे काहीही नाही. अनेक दाम्पत्य मुलं न झाल्यास दत्तक घेण्याचा विचार करतात. यामुळे महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. तसेही मुलं न होण्याचे कारण तपासणीनंतर माहीत होते. नेमका दोष कोणामध्ये आहे, याची माहिती मिळत असल्याने औषधोपचार करणे सोपे झाले आहे.

आज मुलं दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यात मुलींना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. पूर्वी ‘वंशाचा दिवा’ म्हणून मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु, आता अनेक दाम्पत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे असल्याचे दिसून येते. एकूण दत्तक घेतलेल्या मुलांमध्ये ७५ टक्के प्रमाण हे मुलींचे असल्याने हे सिद्ध होते. मागील पाच वर्षांत नागपूर जिल्ह्यातून तब्बल ३६८ बालकांना जिल्ह्याबाहेर तर यातील ३८ मुलांचे परदेशातील दाम्पत्यांना दत्तक घेतले आहे.

कोण घेऊ शकतात मुलांना दत्तक?

प्रत्येकाला मुलं दत्तक घेता येत नाही. याचे काही नियम आहेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलं दत्तक घेऊ इच्छिणाऱ्याचे वय आहे. ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जोडप्यांना बाळ दत्तक दिले जात नाही. ज्या पालकांच्या वयाची बेरीज ९० येते आशांना ० ते २ वयोगटातील मुलं दत्तक दिले जाते. तसेच ज्यांच्या वयाची बेरीज ९० ते शंभर येते अशांना २ ते ४ वयोगटातील तर ज्यांच्या वयाची बेरीज शंभर ते ११० येते आशा दामपत्यांना ४ ते ८ वयोगटातील मुलं दत्तक दिले जाते.

या संस्था देतात मुलं दत्तक

नागपूर जिल्ह्यात एकूण सहा दत्तक संस्था आहेत. जे मुलं दत्तक देण्याचे काम करीत असतात. मातृसेवा संघ, वरदान, न्यू एनर्जी, नॅशनल शिशुगृह, श्रद्धानंद व बालाश्रम. या संस्थांकडून साधारणपणे ० ते ६ वयोगाटातील बालकांना दत्तक दिले जात असते. मुलींना लवकर दिले जाते. यामुळे दाम्पत्यांचा कल मुली दत्तक घेण्याकडे असतो.

ही आहे साइट

ज्याही दाम्पत्याला मुलं दत्तक घ्यायचे आहे त्यांनी इकडे तिकडे चौकशी न करता www.cara.nic.in या साइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. यानंतर महिनाभरात दाम्पत्याची संबंधित संस्थेमार्फत चौकशी केली जाते. यानंतर ऑनलाइन माहिती अपलोड करून मुलं दत्तक दिले जाते. यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागत असतो.

दोन वर्षांपर्यंत पाठपुरावा

जो दाम्पत्य अगोदर नोंदणी करेल त्याला सुरुवातीला बाळ दत्तक दिले जाते. त्याने पसंत केलेले बाळ कोणत्याही कारणाने दिले गेले नाही तर त्यानंतर पसंत करणाऱ्या दाम्पत्याला ते बाळ दत्तक देण्याची प्रक्रिया राबवली जाते. पूर्ण चौकशी करूनच बाळ दिले जाते. एकदा बाळ दत्तक दिल्यानंतर दोन वर्ष त्याचा पाठपुरावा केला जातो. दर सहा महिन्यांची दाम्पत्याच्या घरी जाऊन बाळाची माहिती घेतील जात असते. बाळाची योग्य काळजी घेत नसल्याचे लक्षात आल्यास ते परत घेतले जाते.

पालकांनी नोंदणी करूनच मुलं दत्तक घ्यावे. परस्पर कोणाकडूनही बाळ दत्तक घेऊ नका. असे केल्यास कायद्यात कारवाई करण्याचे प्रावधान आहे. जिल्हास्तरावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संबंधित शिशुगृहाचे वैद्यकीय अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ता यांची समिती दत्तक विधानास योग्य कागदपत्रांची जबाबदारी पूर्ण करून बाळ दत्तक देत असतात.
– मुश्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, नागपूर
पाच वर्षांत दत्तक दिलेले बाळ

वर्ष दत्तक मुलं

२०१६ ६२

२०१७ ७१

२०१८ ९२

२०१९ ६७

२०२० ३२

मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण ७५ टक्के

गरिबीमुळे किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ सोडून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशी बेवारस मुले बाल समितीच्या माध्यमातून अनाथालयात जातात. या सहा संस्थांमधून पाच वर्षांत ३६८ मुलांना दत्तक देण्यात आले आहे. तर गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याबाहेरून जिल्ह्यात ५० मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. दाम्पत्याकडून मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे.

बाळ दत्तक घेण्यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच बाल संरक्षण कक्षाला भेट द्या किंवा कॉल करा. कुणीही परस्पर बाळ दत्तक देऊ नये किंवा घेऊ नये. बेकायदेशीररीत्या बाळ दत्तक घेणे गुन्हा आहे. बेकायदेशीररीत्या बाळ घेणारे किंवा बाळ देणारे अशा दोन्ही कुटुंबावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. बाळ दत्तक घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. परंतु, ही प्रक्रिया किचकट नक्कीच नाही.
– माधुरी भोयर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, वर्धा
(Want-to-adopt-children?-So-read-the-whole-process)

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here