Nilesh Nagrale
चंद्रपूर – वर्ष 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा झाली, अनेकांचे रोजगार बुडाले, मात्र त्यांचे पुनर्वसन झाले नाही, राज्यातील सत्ता बदल झाल्यावर महाविकास आघाडीने दारूबंदी उठविण्याची कवायद सुरू केली व वर्ष 2021 ला यासंबंधी रीतसर घोषणा झाली.
दारू परवाना धारकांनी आपली परवाने नूतनीकरण करण्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अर्ज केला.
दारूबंदी होण्याआधी चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 561 दारू दुकानांना परवानगी होती.
दारूबंदी झाल्याने सर्व परवाने संपुष्टात आले, अनेकांनी आपली दुकाने बाहेर जिल्ह्यात हलवली.
25 जूनपर्यंत उत्पादन शुल्क विभागाकडे तब्बल 216 परवानाधारकांनी अर्ज केला, त्यामध्ये 124 अर्जाची पडताळणी करण्यात आली.
तर काही ठिकाणी मोका चौकशी सुद्धा पार पडली.
जिल्ह्यातील काही भागात दारू दुकाने सुरू करण्यास स्थानिक नागरिक व महिलांचा विरोध होत आहे, दारूची दुकाने गावाबाहेर हलवावी अशी मागणी अनेक महिलांनी केली आहे.
दुकाने स्थलांतरित केली असणार व नव्या जागी दारू दुकान सुरू करायचं असल्यास शासन नियमानुसार परवाना धारकांना अर्ज करावा लागेल.
मोका चौकशी झालेल्या दारू दुकानाच्या परवान्याची फाईल जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्याजवळ पाठविल्या असून त्यामध्ये तब्बल 80 दुकानांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे, पुढील 2 दिवसात दारू दुकानांना परवानगी मिळणार असून जुलै महिन्याच्या पहिल्या हफत्यात दारू दुकाने सुरू होणार असल्याची शक्यता आहे