Home Breaking News Maharashtra Lockdown : सोमवारपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद!

Maharashtra Lockdown : सोमवारपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद!

70
0

Pratikar News

27 Jun 2021

By- Nilesh Nagrale

Maharashtra Lockdown : सोमवारपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद! अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक- कुठं काय सुरु, काय बंद…

Maharashtra Lockdown : सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.

Maharashtra pune lockdown : राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.

पुण्यात काय सुरु काय बंद
पुण्यात आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून पुणेकरांना नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावषक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.

 

सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावषक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.
मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.
अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.
लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक
अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी
कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील

कल्याण डोंबिवलीतही नव्या निर्बंधांची अंमलबजावणी

कोविडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने सोमवारपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. केडीएमसीचा या आठवड्यात लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले होते. मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीलाही लेव्हल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले असून प्रशासनाने यासंदर्भातील नवीन आदेश नुकतेच जारी केले आहेत.

या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरू ठेवता येतील. मॉल आणि मल्टिप्लेक्स यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाहीये. कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने सायं 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील.त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील.उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या 50 टक्के सायंकाली 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. याच वेळेत मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल. असे 4 जून रोजी काढलेले स्तर 3 चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत. सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

यवतमाळ : ब्रेक द चेनअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी 28 जूनपासून नवीन आदेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सोमवार ते शुक्रवारपर्यंत 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची वेळ असणार आहे. तर शनिवार रविवार पूर्णतः बंद असणार आहे. हॉटेल रेस्टॉरंट 4 वाजेपर्यंत, बँक 4 वाजेपर्यंत सुरु असणार आहे. तर शाळा कॉलेज, शिकवणी, मंदिर पूर्णपणे बंद असणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश जारी केले आहेत.

जालना : जालना जिल्ह्यात उद्यापासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संध्याकाळी 5 चे पहाटे 5 पर्यंत संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना सायंकाळी चार पर्यंत सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि अस्थापना पूर्णपणे बंद असतील. हॉटेल 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत. दरम्यान या काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित जमण्यास देखील मनाई असणार आहे.

चंद्रपूर : सोमवारपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4
बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

बुलढाणा: सोमवारपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4
बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

अकोला : सोमवारपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4
बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

अमरावती : सोमवारपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4
बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here