Home आपला जिल्हा शिवसेना नेत्या सिंधू जाधव आक्रमक …….टेकामांडवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार पण...

शिवसेना नेत्या सिंधू जाधव आक्रमक …….टेकामांडवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार पण वैद्यकीय सेवेचे तीनतेरा..

188
0

शिवसेना नेत्या सिंधू जाधव आक्रमक …….टेकामांडवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार पण वैद्यकीय सेवेचे तीनतेरा….. राजुरा… जिवती तालुक्यातील टेकामांडवा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली असून या बांधकामावर लाखोंचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण १५ वर्षानंतरही या इमारतीत आरोग्य सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे पहाडी जनतेला वैद्यकीय सेवे पासून वंचित राहावे लागत आहे. सध्या या इमारतीत जनावरांचे वास्तव्य असल्याने सेनेच्या तालुका संघटिका सिंधू जाधव चांगल्याच आक्रमक झाल्या आहे.आरोग्य केंद्र कार्यान्वित करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. …..जिवती तालुका हा अत्यंत मागासलेला असून पहाडी जनता दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव्य आहे. दऱ्याखोऱ्यामुळे जनता पायाभूत सुविधे पासून वंचित आहे.त्यातच सरकारी योजना देखील जनतेपर्यंत पोहचत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जनतेला अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान पहाडावर आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असून जनतेला उपचारासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे जनतेला आरोग्य सेवा मिळावी याकरीता टेकामंडवा गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली व यावर लाखोंचा निधी खर्च करण्यात आला आहे.पण १५ वर्षानंतर देखील केंद्र सुरू न झाल्याने सध्या इमारतीत जनावरांचे वास्तव्य आहे.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. आरोग्य विभागाच्या याच नाकर्तेपणामुळे जनतेला वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात शिवसेना तालुका संघटिका सिंधू जाधव यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्र लिहून केंद्र कार्यान्वित करा अशी मागणी केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here