Home राज्य केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कायम करावे. — आमदार...

केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कायम करावे. — आमदार सुभाष धोटे.

66
0

केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कायम करावे.
— आमदार सुभाष धोटे.

राजुरा(ता.प्र) :–
काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून आणि आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौक येथे आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून ओबीसीचे आरक्षण संपविणाऱ्या मोदी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. तसेच संविधानाच्या रक्षणाची शपथ घेण्यात आली.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण उपलब्ध करून दिले. मात्र सध्या केंद्रातील मोदी सरकार आपण आरक्षण विरोधी नाही असे भासवून प्रत्यक्षात आरक्षण विरोधी धोरण व छुपा अजेंडा राबवित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील मोदी सरकारच कारणीभूत असून त्यांनी ते पून्हा कायम करावे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ात ओबीसी आरक्षण अनुक्रमे ११ व ६ टक्के आहे ते येथे व संपूर्ण महाराष्ट्रात २७ लागू करण्यात यावे, जनगणनेत ओबीसींचा कालम देऊन ओबीसींची जनगणना करावी असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, अॅड सदानंद लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरणुले, स न वि यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, न प सभापती हरजीत सिंग संधू, गजानन भटारकर, माजिद कुरेशी, नगरसेविका दिपा करमनकर, गिता रोहने, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, प स सदस्य तुकाराम मानुसमारे, सरपंच राजू पिंपळशेंडे, लहु चहारे, शिवराम लांडे, विकास देवाळकर माजी नगरसेवक प्रभाकर येरने, पंढरी चंन्ने, रामपूरचे सरपंच वंदना गौरकर, धनराज चिंचोलकर, राजकुमार ठाकूर, सय्यद साबीर, सारंग गिरसाळवे, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर, नंदाताई गेडाम, पुनम गिरसावळे, मंगला हांडे, योगिता मटाले यासह राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस, शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here