Home कृषी 1 लाख 29 हजार रुपये किमतीचे बोगस कापूस बियानाचे 172 पाकीट जप्त,,...

1 लाख 29 हजार रुपये किमतीचे बोगस कापूस बियानाचे 172 पाकीट जप्त,, *राजुरा पोलीस व कृषी विभागची संयुक्त कारवाई*

146
0

1 लाख 29 हजार रुपये किमतीचे बोगस कापूस बियानाचे 172 पाकीट जप्त,,
*राजुरा पोलीस व कृषी विभागची संयुक्त कारवाई*
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
राजुरा तालुक्यातील वरोडा येथील एका शेतकर्याचे शेतातील गोठ्यातुन सुमारे 1 लाख 29 हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित बीटी कापूस बियानाचे 172 सह एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई आज दुपारी करण्यात आली
वरोडा शिवारात एका शेतात बोगस बीटी बियानाचे साठवणूक असल्याचे माहितीवरून राजुरा पोलिसांनी धाड टाकली असता प्रतिबंधित कापूस बियाणे आढळून आले त्यामुळे पोलिसांनी लगेच कृषी विभागाला याची माहिती दिली माहिती मिळताच कृषी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून संयुक्त पणे झडती घेतली असता चार पोत्यात कोहिनुर,शक्ती गोल्ड,जादू कंपनीचे 172 पाकीट जप्त केले या बियाणांची सुमारे 1 लाख 29 हजार रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले
यावेळी शेत मालक सादु नांदेकर व सुभाष तुंमेवार यांची कसून चौकशी केली असता सुभाष तुंमेवार यांनीच ही प्रतिबंधित कापूस बियाणे शेतकऱ्याना विक्रीस आणले असून यात शेतमालकाचा कोणताही सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले,यावरून सुभाष तुंमेवार यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी दिली
ही मोहीम राजुरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सुनील झुरमुरे,उपनिरीक्षक ओम गेडाम,संघपाल गेडाम,अविनाश बाम्बोडे,महिपत कुमरे,दिनेश मेश्राम ,नारायण सोनुने,कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद मोरे,तालुका कृषी अधिकारी व्ही के मक्केपले,मंडळ अधिकारी सी के चव्हाण ,नितीन कांबळे आदी कर्मचाऱयांनी केली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here