Home Breaking News आदीवासी वसतीगृह इमारत साहीत्य चोरीला ! कोटय़ावधिचा निधि पाण्यात?...

आदीवासी वसतीगृह इमारत साहीत्य चोरीला ! कोटय़ावधिचा निधि पाण्यात? इमारत ठरली प्रेमीयुगलाचे आश्रयस्थान ! आदीवासी विकास विभागाची दिरंगाई. ?

159
0

आदीवासी वस्तीगुह इमारत साहीत्य चोरीला कोटय़ावधिचा निधि पाण्यात? इमारत ठरली प्रेमीयुगलाचे आश्रयस्थान आदीवासी विकास विभागाची दिरंगाई. ? चंद्रपूर जिल्ह्याच्या तेलंगणा राज्याच्या सीमेवरील आदिवासी दुर्गम भागातील कोरपना तालुक्यामध्ये गडचांदूर या औद्योगिक नगरी माणिकगड सिमेंट कंपनी च्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी भागातील आदिवासी मुला मुलींचे शैक्षणिक विकास व प्रगती साठी म्हणून गडचांदूर पाटण या मुख्य रस्त्यालगत गट क्रमांक २/१ची जिल्हाधिकारी चन्द्रपुर यांचे आदेश क्र ३५व३६ LNA= 22/१२-१३ दि २ / २ / २०१३व २२ /२/२०१३ अन्वये प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास चंद्रपूर आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाकरिता मोजा हिरापूर येथील एक हेक्टर 47 आर जमीन मा उच्च न्यायालय मुंबई क्रमांक 102 / I2 ज्या निर्देश ले अनुसरुन एकात्मिक आदिवासी विकास वस्तीगृह गडचांदूर स्थित हिरापूर येथील जमीन प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग यांना वस्तीगृह शैक्षणिक प्रयोजनासाठी शाश्वत भोगवटादार अधिकारासह जमीन भोग अधिकार पट्ट्यावर देण्यात आली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 उपबंध भोगवटदार करारात कबूल केलेल्या शर्तीच्या अधीन उपलब्ध करून देण्यात आली होती महाराष्ट्र शासनाने या कामासाठी आर्थिक सहा कोटी निधीची तरतूद करून उपरोक्त कामाचे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक यांच्या मार्फतीने उपरोक्त जमिनीवर आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी अद्यावत सर्व सोयी सुविधायुक्त देखण्या इमारती व वास्तू उभ्या झाल्या आदिवासींच्या कल्याणासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती करिता बांधण्यात आलेली इमारत गेल्या तीन वर्षापासून उद्घाटनाच्या अभावी दुर्लक्षित राहिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उपरोक्त इमारतीचे बांधकाम सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन सात एप्रिल 2017 रोजी कायदेशीर ताबा इमारतीचा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग यांना दिला तसेच या इमारतींना पिण्याच्या पाण्याच्या सुविधा करिता बो कुळ डोह येथून नळ योजना व पाण्याचे पिण्याची व्यवस्था करण्यासाठी कामाची सुरुवात देखील करण्यात आली ते काम अर्धवट अस्ताव्यस्त पडले आहे शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या दोन्ही इमारती 2019 पर्यंत सुव्यवस्थित होत्या मात्र सन २०२०-२१वित्तीय वर्षात आदिवासी विकास विभागाच्या दिरंगाई व दुर्लक्ष पणामुळे शासनाच्या कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याचे विदारक चित्र या ठिकाणी दिसून येते या इमारती अद्यावत असताना इमारतीमधील फॅन इलेक्ट्रिक साहित्य दरवाजे खिडक्या चे काचा स्टील राड मार्बल टाइल्स सर्व चोरीला गेले याठिकाणी जुगाराचा अड्डा दारूच्या खाली बाटल्या व प्रेमीयुगुलांचे गुलछडी उडवण्याचे आश्रयस्थान झाल्याचे चित्र पाहायला मिळते आदिवासी विकास विभागाच्या कल्याणाच्या मोठमोठ्या घोषणा करून शासन पाठ थोपटत असले तरी प्रत्यक्षात विकासाची अवदशा तिथे दिसते हे ठिकाण गावाच्या बाहेर नमन रम्य हरित सौंदर्याने नटलेले आहे या ठिकाणी उत्साही तरुणाई व प्रेमीयुगल युगुलांचा विचित्र चाळे होत असल्याने गॅंग रेप सारखी घटना होण्यास विलंब होणार नाही माथेफिरू मुळे निष्पाप बळी जाण्याची घटना नाकारता येणार नाही आदिवासी विकास विभागाच्या ताब्यात असलेल्या कोट्यावधी रुपयांचे बांधकाम केलेले इमारती नास घूस शासकीय मालमत्तेच्या चोरीला जबाबदार कोण या ठिकाणी असलेले सर्व साहित्य अद्यावत इमारती व महागडी साहित्य चोरीला गेली कशी हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय असून कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार इथे सुरु आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबीद अली विकास टेकाम माणिकराव आडे विनोद जुमडे प्रवीण जाधव रोशन बुरेवार जि वती वरून येताना शासनाच्या इमारती दुर्लक्षित का म्हणून पाहणी करायला गेले असताना हा प्रकार उघडकीस आला यावेळी अस्तावस्त अवस्थेत पडलेले साहित्य दरवाज्याची तोडफोड मुख्य दार उघडे पाहून इमारतीचा फेरफटका मारला असता हा प्रकार उघडकीस आला संपूर्ण चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले उपरोक्त उपक्रम आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक कल्याणासाठी राबवली असताना ज्या विभागाकडे या इमारतीची देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी आहे त्या विभागाने दुर्लक्ष का केले हे न सुटणारे कोडे असून शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यात यावी व तातडीने त्याठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन आदिवासी विद्यार्थ्यांकरीता इमारती उपलब्ध करून द्यावे व या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक पालकमंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळू धानोरकर आमदार सुभाष धोटे यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here