Home आपला जिल्हा मुलाच्या वाढदिवसानिमित्य कुटूंबातील सदस्यांच्या हस्ते २०० झाडांची लागवड

मुलाच्या वाढदिवसानिमित्य कुटूंबातील सदस्यांच्या हस्ते २०० झाडांची लागवड

46
0

मुलाच्या वाढदिवसानिमित्य कुटूंबातील सदस्यांच्या हस्ते २०० झाडांची लागवड

राजुरा – आज प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे निसर्गात अनियमितता आली आहे. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाड लावून उपयोग होत नाही. त्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणूनच आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. ही जाण कुटूंबातील प्रत्येक सदस्याला व्हावी म्हणून एक मोकळा श्वास कृषी पयर्टन केंद्र चनाखा चे संचालक रूपेश शिवणकर यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्य कुटूंबातील सदस्यांच्या हस्ते विविध प्रजातीच्या २०० झाडांची लागवड करूण समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.‌ वाढदिवस म्हटला की, नातेवाईकांना, मीत्र-मंडळींना बोलवून मौज-मज्जा करीत वाढदिवस साजरा करून निव्वळ वायफळ खर्च केला जातो. त्यातून कुठलाही व कुणालाही फायदा मात्र होत नाही अनेकांचा पैसा व वेळ वाया जातो. परंतू एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्राचे संचालक रूपेश शिवनकर यांनी त्यांचा मुलगा चि. ऋग्वेद याचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले. वाढदिवसानिमित्य एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रात सर्व नातेवाईक, मित्र-मंडळी परिवारातील सदस्यांना एकत्रित करीत त्यांच्या हस्ते याठीकाणी विविध प्रजातीच्या २०० झाडांची लागवड करून वाढदिवस साजरा केला. सर्व नातेवाई, मित्रमंडळी, पर्यटन केंद्रात काम करणाऱ्या सर्व मजूरांच्या कुटूंबांनाही बोलविण्यात आले. लहाणग्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच वृक्षांची लागवड करीत हे, माझे झाड, ते तुझे झाड म्हणीत या झाडांची फळे मीच खाणार अशी भावना व्यक्त करीत झाडाचे संगोपन करण्याची तयारीही दर्शविली. याप्रसंगी एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्र चनाखा चे संचालक रिंकू मरस्कोले, नितिन मुसळे, उर्मीला मरस्कोले, पराग ढोक, शकूंतला, शिवनकर पवन पाल, राकेश शिवनकर, नितीन भुरकुंडे, स्वप्नील गोहणे सह इतर नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

कोट- निसर्गाबद्दल प्रेम असल्याने निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, वाढत्या वृक्ष तोडीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या अनियमिततेवर मात करण्याच्या हेतूने व याची जाण इतरांना होण्याच्या दृष्टीने मुलाच्या नामकरणापासून ते येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे ठरविले. यात फक्त आपणच नाही तर कुटूंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी यांनाही ही जाण व्हावी म्हणून त्यांना एकत्रित करीत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. नातेवाईक, मित्रमंडळींनी मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शवित वृक्षांची लागवड केली. आज तीन वर्षे पूर्ण झाली असून पुढील प्रत्येक वाढदिवसाला अशाच प्रकारे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. . . . . रूपेश शिवणकर, संचालक एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्र, चनाखा यांनी माहिती दिली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here