Home विशेष जबरान जोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन राजू झोडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन*

जबरान जोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन राजू झोडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन*

24
0

*जबरानजोत शेतकरी धडकणार तहसील कचेरीवर*

*जबरान जोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन राजू झोडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन*

*मुल:-* मूल तालुक्यातील आदिवासी व गैरे आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात मुल तहसील कचेरीवर उद्या शुक्रवार २५ जुन २०२१ सकाळी ११.००वाजता धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.
मूल तालुक्यात असंख्य जबरान जोत शेतकरी आहेत. मागील कित्येक वर्षापासून शेतकरी शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. परंतु शेतकऱ्यांवर वन विभागाचा व प्रशासनाचा दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या तीन पिढ्याची जाचक अट रद्द करण्यात यावी. वनहक्क कायद्यानुसार आदिवासी व गैर आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. वन विभागाचा शेतकऱ्यांवरचा वाढता अन्याय बंद करण्यात यावा. मूल तालुक्यातील जबरान जोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा. वहिवाट झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात मुणाऱ्या टाकू नये अशा विविध मागण्यांना घेऊन जबरान जोत शेतकरी तहसील कचेरीवर धडकणार आहेत.
सदर धरणे आंदोलनात जास्तीत जास्त जबरान जोत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here