Home Breaking News ईरई नदीवरील जीवघेण्या पुलाऐवजी नवीन पुलाची निर्मिती करा:- राजु झोडे* *पायली,...

ईरई नदीवरील जीवघेण्या पुलाऐवजी नवीन पुलाची निर्मिती करा:- राजु झोडे* *पायली, भटाळी, चिचोंली, तिरवंजा येथील गावकऱ्यांची मागणी*

52
0

*ईरई नदीवरील जीवघेण्या पुलाऐवजी नवीन पुलाची निर्मिती करा:- राजु झोडे*

*पायली, भटाळी, चिचोंली, तिरवंजा येथील गावकऱ्यांची मागणी*

भटाळी, पायली, चिचोंली, तिरवंजा या गावाकडे जाणार्‍या मार्गावर ईरई नदीवरील पूल लहान असल्यामुळे दरवर्षी या पुलावरून पुर येतो.त्यामुळे पावसाळ्यात गावातील नागरिकांना व या मार्गावरून जाणाऱ्या कोळसा खदान येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत असते. दरवर्षी या पुलामुळे कित्येक जणांचा जीव सुद्धा गेलेला आहे. गावातील संतप्त नागरिकांनी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नवीन पुलाच्या मागणीकरिता वंचितचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात आज गावकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले.
जुन्या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे व अरुंद असल्यामुळे सदर पुलावर नेहमी पूर येतो. पुल जिर्ण झाल्यामुळे केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजपावेतो या पुलामुळे अठरा लोकांचा जीव सुद्धा गेलेला आहे. वरील गावातील नागरिक व कोळसा खदान येथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन दररोज या पुलावरून प्रवास करत असतात.भविष्यात या पुलामुळे पुन्हा मोठी हानी होऊ नये व गावातील नागरिकांना तसेच कोळसा खदान येथील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याकरिता नवीन पुलाची निर्मिती करावी या मागणी करता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
जर वरील मागणी पूर्ण झाली नाही तर सदर नवीन पुलाच्या मागणी करिता सर्व गावकरी मिळून तीव्र आंदोलन करणार असा इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला. निवेदन देतांना वंचितचे नेते राजू झोडे, जॉकिर खान, गुरु भगत ,ईश्वर मुसळे, सागर कातकर, नदिम रायपूरे,सुरज थेरे तथा अन्य गावकरी उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here