Home Breaking News धान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा* *आ. सुधीर मुनगंटीवार याची अन्न...

धान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा* *आ. सुधीर मुनगंटीवार याची अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा*

61
0

*धान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा*
*आ. सुधीर मुनगंटीवार याची अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा*
*ना. छगन भुजबळ यांचे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन*

राज्य सरकारने धान उत्पादक शेतक-यांना देण्‍यात येणाच्या बोनसची रक्कम अद्याप प्रदान केलेली नाही.. त्‍यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्‍हयातील धान उत्पादक शेतक-यांवर अन्‍याय होतो आहे. सध्‍या शेतीची कामे सुरु झाली असुन बी-बीयाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी करावयास व शेतीकामास शेतक-यांना पैश्‍यांची गरज असताना त्‍यांच्‍या हक्‍काचे बोनस शासनाद्वारे देण्‍यात येत, नसल्‍यामुळे धान उत्‍पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. येणाऱ्या सात दिवसांच्‍या आत धान उत्‍पादकांना बोनस त्वरित देण्यात यावा अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे केली. सदर मागणी तपासून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिले.

आज 22 जून रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ना. छगन भुजबळ यांची भेट घेत चर्चा केली व मागणीचे निवेदन सादर केले . यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले , महाराष्‍ट्र शासनाद्वारे धान उत्‍पादक शेतक-यांना एप्रिल महिन्‍यामध्‍येच त्‍यांच्‍या हक्‍काचे बोनस मिळणे अपेक्षित होते. पण जुन महिन्‍याचा मध्‍य उलटून गेला असताना अद्याप बोनस मिळालेले नाही. त्‍याच प्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्‍यात आलेल्‍या धानाचे पैसे सुद्धा ब-याच शेतक-यांना मिळालेले नाही. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्‍यात येतो. तो देखील अनेक शेतक-यांना मिळालेला नाही आहे. त्‍यामुळे गरिब शेतक-यांना खाजगी दुकानातुन महागात बिजाई खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्‍यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बोनसपोटी शेतकऱ्यांचे 800 कोटी रू शासनाकडे थकीत आहे ,याकडे त्यांनी छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले.

सध्‍या शेतीचे कामे सुरु झाले असताना गोरगरिब शेतक-यांना शेतीविषय साहित्‍य खरेदीसाठी व शेतीकामासाठी पैश्‍यांची गरज असते. मात्र ऐन हंगामात शासनाकडून बोनस देण्‍यात आले नसल्‍यामुळे गोरगरिब शेतक-यांवरती अन्‍याय होत आहे. शासन शेतक-यांची आर्थिक कोंडी करुन त्‍यांच्‍यावरती अन्‍याय करीत आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे .त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस त्वरित देण्यात यावा असे आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here