Home Breaking News तीन हजाराची लाच घेताना मंडळ निरीक्षकास रंगेहात पकडले,,, मुल तालुक्याचे बेंबाळ चे...

तीन हजाराची लाच घेताना मंडळ निरीक्षकास रंगेहात पकडले,,, मुल तालुक्याचे बेंबाळ चे मंडळ निरीक्षक

236
0

तीन हजाराची लाच घेताना मंडळ निरीक्षकास रंगेहात पकडले,,,
मुल तालुक्याचे बेंबाळ चे मंडळ निरीक्षक

राजुरा (संतोष कुंदोजवार ) मूल तालुक्यातील भेजगाव येथील एका शेतकऱ्याकडून फेरफार करिता तीन हजार रुपयांची लाच घेताना बेंबाळ सर्कलचे मंडल निरीक्षक महादेव कन्नाके यास लाचलुचपत विभाग चंद्रपूरच्या पथकांनी आज १२ वाजताचे दरम्यान रंगेहात पकडले . भेजगाव येथील शेतकरी आणि सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांचेकडून फेरफार करिता महादेव कन्नाके यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली . तीन हजारांमध्ये तडजोड झाली . मात्र अखिल गांगरेड्डीवार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभाग चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली . आज लाचलुचपत विभागाने मूलचे तहसील कार्यालयाजवळ सापळा रचला आणि अखिल गांगरेड्डीवार यांचे कडून तीन हजार रुपये घेताना महादेव कन्नाके यास रंगेहाथ पकडले . महादेव कन्नाके यांच्याबद्दल अनेक तक्रारी असून सामान्य शेतकऱ्यांना ते वारंवार त्रास देत असल्याच्याही तक्रारी आहेत सरपंच यासारख्या व्यक्तीकडून लाच घेण्याची हिंमत त्यांनी केली मात्र ते अलगद जाळ्यात पकडल्याने , अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे . पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here