Home आपला जिल्हा सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष...

सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट.

39
0

कुपोषण मुक्तीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
— आमदार सुभाष धोटे.

सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट.

राजुरा,चंद्रपूर (संतोष कुंदोजवार) :–
आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या पुढाकाराने आणि बाळु संस्थेच्या माध्यमातून राजुरा तालुक्यातील राजुरा ग्रामीण आणि शहरी भागातील २५ कुपोषित बालकांना प्रत्येकी एक या प्रमाणे बाळु साहित्य किट भेट देण्यात आली.
या प्रत्येक किट मध्ये २ किलो मोट, २ किलो चना, २ किलो मुंग, २ किलो बरबटी, २ किलो वटाना, १ किलो नाचणी, १ किलो शेंगदाणे, १ किलो गुळ हे बाळु साहित्य भेट देण्यात आले.
या प्रसंगी मानव सेवा हिच ईश्वर सेवा म्हाणून कायम सेवा कार्य करीत असून क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा आपण करीत राहणार आहोत. संतुलित समाज हे एक आदर्श स्वप्न आहे , कुपोषण मुक्त समाजासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होणे काळाची गरज आहे. त्यामुळे या कार्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा परिषद सदस्य मेघाताई नलगे, उपसभापती मंगेश गुरणुले, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, पंचायत समिती सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, राजुरा,कोरपना,जिवती चे बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले, शरद पारखी, गणेश जाधव उपस्थित होते
यासह कुपोषित बालक, त्यांचे पालक, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी तर आभार प्रदर्शन बाळु संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थेच्या सदस्यांनी अनमोल सहकार्य केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here