Home राज्य तिरोड्याच्या माजी आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, देशमुखांची घरवापसी

तिरोड्याच्या माजी आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, देशमुखांची घरवापसी

12
0

Pratikar News

मुंबई : अमरावतीचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख (dr sunil deshmukh) आणि तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बन्सोड (tiroda ex mla dilip bansod) यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एच. के. पाटील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह ऊर्जामंत्री नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. (dr sunil deshmukh and tiroda ex mla dilip bansod enters into congress)

दिलीप बन्सोड हे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांनी तिरोडा या गोंदिया जिल्ह्यातील मतदारसंघातून २००४ ची विधानसभा निवडणूक लढविली. ते २००४ ते २००९ या कालखंडात आमदार होते. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादीने त्यांना तिकीट नाकारले. तेव्हापासून ते पक्षावर नाराज होते. २०२९ मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. अखेर आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीबद्दलची खंत बोलून दाखविली.

तसेच माजी राज्यमंत्री तसेच अमरावतीचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी देखील आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली. डॉ. सुनिल देशमुख अमरावती महापालिकेच्या राजकारणात सक्रीय होते. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून थेट मुंबई गाठली. त्यांनी राज्याचे अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री म्हणूनही सत्ता उपभोगली. त्यांची कारकीर्द चांगली सुरू होती. मात्र, २००९ मध्ये देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना काँग्रेसने त्यांना डावलून रावसाहेब शेखावत यांना अमरावती विधानसभा मतदारसंगाची उमेदवारी दिली. यावेळी त्यांनी बंडखोरपणा करत अपक्ष निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला, तर रावसाहेब शेखावत आमदार झाले. याच नाराजीमधून त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत पुन्हा भाजपकडून आमदार झाले. पण, पुढच्या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी डॉ. देशमुखांचा पराभव केला आणि आज अखेर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here