Home क्राइम शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या तरुणीचा तीन मित्रांनी केला खून

शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या तरुणीचा तीन मित्रांनी केला खून

74
0

Pratikar News

चाकूने शरीरावर केले २४ घाव, हाडात चाकू तुटल्यानंतरच थांबली क्रूरता

 

सध्या मैत्री ,लव्ह आणि धोका याचे प्रमाण भयंकर वाढले आहेत. तरुण तरुणीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढतात आणि नंतर तिला लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. त्यांनतर तिला धोका देऊन अन्य मुलीशी लग्न करतात. मुलींना प्रेम जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करने हाच त्यांचा एकमेव उद्देश असतो. तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करण्याचा त्या तिघा मित्रांचा घाट होता. परंतु तरुणीने त्यास नकार दिल्याने तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्यावर चाकूने २४ घाव घालण्यात आले. जेव्हा तिच्या हाडात चाकू तुटला तेव्हा त्यांची क्रूरता थांबली.

लखनौ : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानेच मित्रांच्या साथीने प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापलेल्या आरोपींनी तरुणीवर चाकूचे सपासप वार करण्यास सुरुवात केली. चाकू जेव्हा तरुणीच्या मणक्यात अडकला, तेव्हा कुठे आरोपींचं क्रौर्य थांबलं. तरुणीच्या प्रियकरासह तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये हा प्रकार घडला.

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here