Home क्राइम मिसेस राजस्थान ला ब्लॅकमेलिंग च्या गुन्हयाखाली अटक अश्लील व्हिडीओ क्लिप बनवून...

मिसेस राजस्थान ला ब्लॅकमेलिंग च्या गुन्हयाखाली अटक अश्लील व्हिडीओ क्लिप बनवून व्यापाऱ्याला करत होती ब्लॅकमेल

20
0

Pratikar News

Nilesh Nagrale

जयपूर, / राजस्थान : जयपूरमध्ये पोलिसांनी ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपात एका महिलेला अ‍टक केली आहे. विशेष म्हणजे ही महिला मिसेस राजस्थान 2019 या सौंदर्य स्पर्धेची विजेती होती. एका व्यापाऱ्याबरोबर अश्लिल व्हिडिओची क्लिप तयार करून ही महिला त्या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत या सौंदर्यवतीला अटक केल्यानं व्यापारी यातून बचावला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये एका महिलेवर पोलिसांनी गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

मिसेस राजस्थान 2019 या स्पर्धेची विजेती असलेली महिला एका व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती. प्रियंका चौधरी असं या महिला आरोपीचं नाव आहे. व्यापाऱ्याबरोबर अश्लिल सीडी तयार करून ही महिला त्यांना ब्लॅकमेल करत होती. व्यापाऱ्याकडं या महिलेनं रोख एक कोटी रुपये आणि कोट्यवधी किंमत असलेली जमीन मागितली होती. मात्र व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतली आणि महिलेचं बिंग फुटलं.

विशेष म्हणजे या महिलेनं आधीदेखिल व्यापाऱ्याकडून 30 लाख रुपयांचे दागिने लुटले होते. जवळपास एका वर्षापासून ही महिला व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती. पण तिच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. या महिलेचा पती हा पोलिस हेड कॉन्स्टेबल आहे. त्याच्या साथीनं मिळून ती व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती.

व्यापाऱ्यानं या प्रकरणी थेट पोलिस आयुक्तांकडं धाव घेतली. एकाच गावची असल्याचं सांगत महिलेनं ओळख वाढवली आणि नंतर ब्लॅकमेंलिंग करू लागली अशी तक्रार व्यापाऱ्याने केली. त्यानंतर पोलिस आयुक्यांनी या प्रकरणी पावलं उचलत कारवाई केली. महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या लॅपटॉपद्वारे तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here