Home Breaking News राजुरा महसूल विभागात वाझे तयार झाल्याने लुटता येते तेवढे लुटा !खांबाडा शेतशिवारात...

राजुरा महसूल विभागात वाझे तयार झाल्याने लुटता येते तेवढे लुटा !खांबाडा शेतशिवारात हजारो ब्रास मातीचे अवैध उत्खनन…. नियमांचे उल्लंघन करून खोदले ‘महाकाय’

70
0

खांबाडा शेतशिवारात हजारो ब्रास मातीचे अवैध उत्खनन…. नियमांचे उल्लंघन करून खोदले ‘महाकाय’ खड्डे…..राजुरा… विरुर स्टेशन परिसरातील खांबाडा शेत शिवारात ‘महाकाय’ खड्डे खोदून हजारो ब्रास मातीचे अवैध उत्खनन करण्यात आले असून ‘लीज’ परवान्याचे खुलेआम उल्लंघन करण्यात आले आहे.या गंभीर प्रकरणात महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. ….तालुक्यातील विरुर स्टेशन परिसरात येत असलेल्या खांबाडा शेत शिवारात माती उत्खनन करण्यासाठी ‘लीज’ येण्यात आली आहे.उत्खनन करतांना लीज मधील अटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.पण संबंधित परवानाधारकाने नियमांला केराची टोपली दाखवून ‘महाकाय’ खड्डे खोदल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.सध्या या शेत शिवारात तीन खड्डे खोदण्यात आले आहे.यातील दोन खड्डे खोदतांना अक्षरशः अटी व शर्तीचा भंग केल्याचे स्पष्ट होत आहे. लांबी अंदाजे १०० फूट असून रुंदी ७० ते ७५ फूट एवढी आहे व खोदकाम ५० ते५५ फूटा पर्यन्त करण्यात आले आहे.या महाकाय खड्डयातुन हजारो ब्रास मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराकडे महसूल कर्मचाऱ्यांनी स्पेशल दुर्लक्ष केल्याने संबंधित परवानाधारकाने मनमानी पध्दतीने खोदकाम केल्याचे दिसून येत आहे. ही माती रेल्वेच्या कामात वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या महाकाय खड्डयाचे मोजमाप केल्यास मातीचे मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.परवान्यापेक्षा जास्त मातीचे उत्खनन केल्याने लाखोंच्या महसूलावर पाणी फेरल्याचा प्रकार उघड्यावर आला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here