Home Breaking News ट्रॅक्टर पलटी झाल्याने तींघांचा करून अंत* = *तिघे सुखरूप बचावले* *मायलेकीच्या मृत्यूने...

ट्रॅक्टर पलटी झाल्याने तींघांचा करून अंत* = *तिघे सुखरूप बचावले* *मायलेकीच्या मृत्यूने देवादवासीय सुन्न* =*देवाडा येथील घटना*

112
0

*ट्रॅक्टर पलटी झाल्याने तींघांचा करून अंत*
=================
*तिघे सुखरूप बचावले* *मायलेकीच्या मृत्यूने देवादवासीय सुन्न*
=================
*देवाडा येथील घटना*
==============
राजुरा :
शेती काम करून परत घरी येत असताना नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने तिघांचा करून अंत झाला असून तीन सुखरूप बचावले.
राजुरा शहरा पासून 18 किलोमीटर अंतरावर देवाडा गावातील मल्लेश शेंडे यांच्या शेतात शेतीच्या मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. शेतीचे काम संपून राजू डामिलवार यांच्या मालकी चे ट्रॅक्टर वर बसून आपल्या घरी परत असताना अचानक आलेल्या पाऊसाने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने ट्रॅक्टर कल्टिव्हेटरसह नाल्यात वाहून गेले. ट्रॅक्टर नाल्यात पडल्याने मृतक माधुरी विनोद वंगणे (वय 27), मलेश शेंडे (वय 45), आणि लक्ष्मी विनोद वगने (वय 7) यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर मालक राजू डामिलवार , बाधू कुमरे व बालवीर कोवे सुखरूप बचावले. वृत लिहे पर्यंत मृतक माधुरी विनोद वंगणे व लक्ष्मी विनोद वगने यांचा मृतदेह सापडला तर मलेश शेंडे अद्याप लापता होते. या घटने मुळे देवाडा गाव सुन्न झाले असून एकाच घरचे आई व मुलगी मरण पावल्याने हळहळ व्यक्त केले जात आहे. घटनास्थळी राजुरा पोलीस पोहचले असून शेंडे यांचा शोध सुरु आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here