Home Breaking News शासनाकडून घरकुल मिळाले नाही म्हणून गावकऱ्यांनीच घर बांधून दिले#

शासनाकडून घरकुल मिळाले नाही म्हणून गावकऱ्यांनीच घर बांधून दिले#

1
0

चंद्रपुर/यवतमाळ:वणी

वणी:तालुक्यातील पिंपळगाव येथील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती पिंपळगांव द्वारा आयोजित श्री अमोल मडावी पिंपळगाव व श्री दशरथ धुर्वे जुनाड यांच्या घरकुल बांधकाम मदतीकरिता जनसेवा हीच ईश्वर सेवा समजुन पिंपळगाव या गावात 30 नोव्हेंबर 2019 ला विश्व विख्यात जादूगार एन.सी. सरकार का मायाजाल हा कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमासाठी विविध दराची तिकीट आकारणी करून जमा झालेल्या पैशातून गावातील नागरिकांनी अतिशय हलाखीची परिस्थिती असणाऱ्या अमोल मडावी पिंपळगाव व श्री दशरथ धुर्वे जुनाड यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा मिळत नव्हता 
अशा वेळी गावकरी मंडळी एकत्र येऊन त्यांना त्यांच्या हक्काचे घर बांधून दिले लोक थोडीशी का मदत केली की गाजावाजा करतात मात्र पिंपळगाव येथील रहिवाश्यांनी ज्या पद्धतीचा पुढाकार घेऊन मदत केली हे बघून माणुसकीचा हाच खरा मार्ग असे लोकांना वाटू लागले 
मागील 6 महिन्यापासून या घराचं काम सुरू होत ते काम पूर्ण झाले असता आज पिंपळगाव गावातील चाबी देताना मा.ग्रामपंचायत सदस्य दिपकभाऊ मत्ते , पिंपळगाव ग्रामपंचायत चे सचिव गजानन शिरगरे , रविंद्र कोडापे , उपेश आवारी , सचिन मत्ते , विकास क्षीरसागर यासह गावकरी उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here