Home Breaking News राजुरा नगर पालिकेत मोठा गैरव्यवहार – अंकेक्षणात ठपका * सुरज ठाकरे यांचा...

राजुरा नगर पालिकेत मोठा गैरव्यवहार – अंकेक्षणात ठपका * सुरज ठाकरे यांचा पत्रपरिषदेत आरोप

204
0

* राजुरा नगर पालिकेत मोठा गैरव्यवहार – अंकेक्षणात ठपका
* सुरज ठाकरे यांचा पत्रपरिषदेत आरोप
राजुरा, वार्ताहर –
राजुरा शहरातील विविध विकास कामांत अनेक वर्षापासुन अनियमितता होत असून मोठा गैरव्यवहार झाला आहे. मात्र राजुरा पालिकेत सर्व पदाधिकारी याविरुद्ध आवाज उठवित नसून आता आपण सर्व कागदपत्रांसह येथील भ्रष्टाचार खणून काढणार असून येथील जनतेला सावध करणार आहे. याविषयी आवश्यकता भासली तर आपण न्यायालयात दाद मागणार आहे. या राजुरा शहराच्या विकासासाठी आपण यापुढे प्रामाणिक प्रयत्न करणार असून जनतेने आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे पत्रकार परिषदेत केले.
राजुरा नगर परिषद हद्दीत अनेक समस्या आहेत. फारुख भंगार विक्रेता यांचे अतिक्रमण, कंत्राटी कामगार यांचे विविध प्रकारचे समस्या आहेत. त्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. नगर परिषद अंतर्गत तलाव संवर्धनाचे काम झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. शासकीय अंकेक्षक यांनी 54 लाख 72 हजार खर्च केलेली रक्कम तात्पुरती अमान्य केली असून 4 लाख 46 हजार रुपये वसूल नगर परिषद कडून करण्यासाठी अहवालात सांगितले आहे. लेखा परीक्षक अहवालात अनेक त्रुटी काढून नगर परिषद, मुख्याधिकारी यांना समज देण्यात आली आहे. कमी मुद्रांक वर करारनामा करणे, कामगारांचे ईपीएफ जमा न करणे, काम सुरू असतांना सुरक्षेसाठी नियमानुसार विमा न काढणे, रॉयल्टी वसूल न करणे, अतिरिक्त कामासाठी शासनाची परवानगी न घेणे, साहीत्य चाचणी न घेता संपूर्ण निधी ठेकेदाराला देणे, राजुरा ते विहिरगाव हे अंतर डबल दर्शविणे व त्याकरिता 26 हजार 500 वसूल जादा देणे, तलावाच्या पाण्याची गुणवत्ता न तपासणे, प्रकल्प सनियंत्रण समितीची स्थापना न करणे, काही योजनांमधील सरकारी योजनेचा पूर्ण खर्च करून नियमात असतांना नगर परिषदेचा दहा टक्के हिस्सा न वापरणे इत्यादी अनेक बाबतीत आक्षेप असल्याचे सूरज ठाकरे यांनी सांगितले. तलाव सौंदर्यीकरण करण्याचा व त्याचे संवर्धन करण्याचा उद्देश सफल झाला नसल्याचे ताशेरे लेखा परीक्षकांनी ओढले आहे. या. बाबत राजुरा नगर परिषद कडून या आरोप चे खंडन करणार आहेत की नाही अजून माहिती मिळाली नाही .
राजुरा शहरात भूमापन क्रमांक 149 या महसूल विभागाच्या जमिनीचा मोठा घोळ झाला असून अनेक लोकांनी आदिवासींना भूलथापा देऊन त्यांचे अवैध हस्तांतर करीत या गरीब आदिवासींच्या व शासकीय जमिनीचे प्लॉट पाडून त्याची खुलेआम विक्री केली असून अजूनही हा प्रकार सुरू आहे. मात्र शासकीय यंत्रणा मूग गिळून बसली असून कुणीही कार्यवाही करीत नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढणार असल्याचे सुरज ठाकरे यावेळी बोलतांना म्हणाले.
नगर पालिका क्षेत्रात झालेल्या विकासकामांच्या गैरव्यवहार प्रकरणी अध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार असून या सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी आणि दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी युवा स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी केली आहे.या  बाबत. नगर
पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष आशिष यमनूरवार,राहुल चव्हाण, निखिल बजाईत,भूपेश सोनोने,पवन चिंतल, अजय टांक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here