Home आपला जिल्हा चिंताजनक :- वरोरा तालुक्यात पाटबंधारे विभागाचे काम निकृष्ट दर्जाचे, बामनडोह...

चिंताजनक :- वरोरा तालुक्यात पाटबंधारे विभागाचे काम निकृष्ट दर्जाचे, बामनडोह नाल्यावरच्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट, कंत्राटदाराची अधिकाऱ्यांशी साठगांठ?

14
0

Pratikar News

 

वरोरा तालुका प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील पाटबंधारे विभागाची जवळपास सर्वच कामे ही निकृष्ट दर्जाची व बोगस असल्याची माहिती असून तालुक्यातील बामनडोह नाल्यावरच्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून कंत्राटदाराची अधिकाऱ्यांशी साठगांठ असल्याचे बोलल्या जात आहे.

या बांधकामाचे कंत्राट हे रशीद पटेल यांना मिळाले असून पाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात गेल्या कित्तेक वर्षापासून त्यांची कामे सुरू असल्याने त्यांचा अधिकाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाण चा व्यवहार आहे त्यामुळे सदर काम हे पेटी कॉन्ट्रेक्टर म्हणून शामराव भोयर यांना मिळाले आहे. दडमल गुरुजी यांच्या शेताला लागून बामनडोह नाल्यावर बंधारा काम असून इस्टिमेट नुसार अभियंता दिलीप ढोक यांच्याकडून कंत्राटदाराला चांगले मजबूत काम करण्यासाठी प्रवृत्त करीत नसल्याने कंत्राटदार हे निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या पैशाची अफरातफर करीत आहे त्यामुळे कंत्राटदार यांच्यासोबत पाटबंधारे अभियंता दिलीप ढोक हे सुद्धा तेवढेच दोषी असल्याने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here